सचिन वाझेंनी जप्त केलेले पुरावे रेकाॅर्डवरच घेतले नाहीत

दुकानदाराने वाझे आणि त्याच्या पथकाने दुकानातील सीसीटिव्ही फुटेज, डिव्हीआर मशीन नेल्याचे कबूल केलं आहे.या संपूर्ण घटनेची आता गंभीर दखल ही घेण्यात आली असून या प्रकरणी CIU च्या अधिकाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे.तर काही बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांची चर्चाही रंगली आहे.
Sachin Waze Avoided taking Evidence on Record in Antellia Case
Sachin Waze Avoided taking Evidence on Record in Antellia Case

मुंबई : उद्योगपती यांच्या घरा शेजारी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तपास अधिकारी असलेल्या सचिन वाझेंनी तपासाच्या नावाखाली ठाण्यातील दुकानदाराची डायरी, रेकॉर्डस, सीसीटीव्हा फुटेज जप्त केले होते.

मात्र, या वस्तू कायद्यानुसार त्यांनी रेकाॅर्डवर घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपासाच्या नावाखाली वाझे यांनी पुरावे नष्ट केले का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनसुख हिरेन प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत असताना, गाडीत सापडलेल्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सद्गुरु कार डेकोरेटरच्या दुकानातुन बनवल्या गेले असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. 

पण या दुकानातून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा कोणताही रेकॉर्ड ठेवण्यात आला नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मात्र, दुकानदाराने वाझे आणि त्याच्या पथकाने दुकानातील सीसीटिव्ही फुटेज,  डिव्हीआर मशीन नेल्याचे कबूल केलं आहे.या संपूर्ण घटनेची आता गंभीर दखल ही घेण्यात आली असून या प्रकरणी CIU च्या अधिकाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे. तर काही बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांची चर्चाही रंगली आहे.

अँटीलियाजवळ ज्या दिवशी स्फोटके सापडली. त्या दिवशी वाझे घटनास्थळाजवळ निश्चिंतपणे उभे राहून सँडविच खात होते. ATS चा एक बडा अधिकारी घटनास्थळी आला होता. त्यावेळी त्याने वाझेंकडे विचारणा केली असता वाझेंनी त्या अधिकाऱ्याकडे कानाडोळा करत, सँडवीच खाता खाताच पोलिस हवालदाराला साहेबांना गाडी दाखव, असे सांगत दुर्लक्ष केले.

पोलिस खात्यातील कोणताही प्रोटोकॉल न पाळता वाझे यांच्या या वागण्यावरून या अधिका-याचे वाझेंसोबत वादही झाला. त्या ATS  अधिकाऱ्याने वाझेंना खडेबोलही सुनावले. त्यांच्या या वागण्याची तोंडी तक्रार या अधिका-याने वरिष्ठांनाही केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.वाझेंना त्या दिवशी ATS च्या या अधिकाऱ्याने झापलं

अँटीलियाजवळ ज्या दिवशी स्फोटकं सापडली. त्या दिवशी वाझे घटनास्थळाजवळ निश्चिंत सँडविच खात होते.ATS चा एक बडा अधिकारी घटनास्थळी वाझेंनी विचारले असता...वाझेंनी त्या अधिकाऱ्याकडे कानाडोळा करत, सँडवीज खाता खाताच पोलिस हवालदाराला साहेबांना गाडी दाखव असे सांगत व दुर्लक्ष केले.

 पोलिस खात्यातील कोणताही प्रोटोकॉल न पाळता वाझे यांच्या या वागण्यावरून या अधिका-याचे वाझेंसोबत वादही झाला.त्या ATS  अधिकाऱ्याने वाझेला खडेबोल सुनावत...त्याच्या या वागण्याची तोंडी तक्रार या अधिका-याने वरिष्ठांनाही केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ज्या ठिकाणी ठाण्याच्या दुकानातून बनावट नंबर प्लेट बनवल्या,  ते पुरावे म्हणून वाझे ATSकडे सोपावत होते. माञ हे पुरावे पंचनाम्यात निदर्शनास न आल्याने ATSने स्विकारले नाही. हे नंबरप्लेट आणण्यासाठी वाझेंच्या सांगण्यावरून CIU चे अधिकारी गेले होते...त्यामुळेच CIUच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जात असून त्यांना NIAचा साक्षीदार बनवण्याच्या प्रयत्नात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत, NIAने मुंबई पोलिस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवण्यासाठी गृहमंञाल़ाकडे परवानगी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com