साहेब, काही तरी करा, लोक भाजपला लई नावं ठेवताहेत!

अकराशे रुपयाची खताची गोणी एकदम १९०० रुपये झाली आहे. याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार. असे निर्णय घेताना पक्षाने कार्यकर्ते, लोकांशी बोलायला पाहिजे. साहेब, तुम्ही काही तरी, लोक भाजपला लई नावं ठेवताहेत हा संवाद आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, इंजि. मनोज देसले आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्यातील.
Anil Bonde- BJP
Anil Bonde- BJP

साक्री : अकराशे रुपयाची खताची गोणी एकदम १९०० रुपये झाली आहे. (pestricide price hiked from 1100 to 1900. This will Affect badly Farmers) याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार. असे निर्णय घेताना पक्षाने कार्यकर्ते, लोकांशी बोलायला पाहिजे. साहेब, (Government shall concern to people for this) तुम्ही काही तरी, लोक भाजपला लई नावं ठेवताहेत हा संवाद आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, इंजि. मनोज देसले आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (conversation in BJP Workers Manoj Desle and Ex Agriculture minister Anil Bonde)यांच्यातील.

या संवादाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाने शेतकरी कसा त्रस्त आहे, हे   पेरेजपूरचे (ता. साक्री) सरपंच व इंजि. मनोज देसले यांनी भाजपच्या विविध नेत्यांना सांगितले. यातील काही नेत्यांनी याबाबत असमर्थता व्यक्त करीत माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्याशी संपर्क करायला सांगितले. त्यामुळे श्री. देसले व भाजपचे माजी मंत्री बोंडे यांच्यात हा संवाद झाला. 

ही ऑडिओ क्लिप खरी आहे काय? अशी शंका यावी एव्हढा हा संवाद टोकदार आहे. त्यामुळे संबंधीत शेतकऱ्याशी साक्री येथे संपर्क करून खातरजमा केली असता, त्यांनी ऑडिओ क्लिप खरी असल्याचे सांगितले.

श्री. देसले श्री. बोंडे यांना म्हणाले, केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढविल्या. त्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या आहेत. दोन वर्षापासून हवालदिल शेतकऱ्याला उध्वस्त करणारा हा निर्णय तात्काळ रद्द करावा.  कृषी विभागाने दिलासादायक निर्णय घ्यावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या चर्चेत केले. 

ते म्हणाले, खताच्या वाढलेल्या किमती शेतकऱ्यांसाठी आर्थिक संकट निर्माण करतील. मी स्वतः कट्टर भाजप समर्थक कार्यकर्ता आहे. प्रगतशील बागायतदार शेतकरी असून माझी ३५ एकर शेती आहे. असा निर्णय घेताना तळागाळातील कार्यकर्ते, शेतकरी यांचे विचार जाणून घेणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्यामुळे भाजप सरकारच्या विरोधात जनतेचा आक्रोश वाढणार आहे. परिणामी येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील. या सबंध संवादात श्री. बोंडे फक्त हो, हो, वरिष्ठांशी बोलतो एव्हढेच म्हणत होते. 

जनतेत प्रचंड रोष
श्री. देसेल म्हणाले, खतांच्या किमती अचानक वाढल्या. अजून लोकांना हे समजलेले नाही. पुढच्या महिन्यात खरीपासाठी खत खरेदीला लोक जातील तेव्हा त्यांना दरवाढ कळल्यावर तिव्र रोषाला सामोरे जावे लागू शकते. खरीप हंगामाच्या तोंडावर साधारण पंचावन्न टक्के दरवाढ झाली. ही बाब सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे नेणारी ठरणार आहे. परिणामी आपण लवकरात लवकर वरिष्ठांशी बोलून या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगा. मला जेव्हढे भाजपचे आपले लोक भेटतात, ते खाजगीत त्यांना लोक भाजपला किती नावं ठेवताहेत हे सांगतात.

मोदी सत्तेवर असावेत ही भावना...
श्री. बोंडे यांच्याशी खतांच्या वाढलेल्या किमतींविषयी बोलताना श्री. देसेल म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता आहे. मी कट्टर भाजपा समर्थक कार्यकर्ता आहे. मला अजून किमान १५ वर्ष या देशाचे पंतप्रधानपद श्री मोदी यांनी भूषवावे असे वाटते. परंतु या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांप्रती संवेदना निश्चितपणाने दाखवाव्यात. अन्यथा कठीण होईल.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com