पेट्रोल १००.१९ रुपये; नाशिककर म्हणतात, `नकोत तुमचे अच्छे दिन`

इंधनाच्या दरवाढीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. काल शहरात पेट्रोलचे दर शंभराच्या पुढे गेले. त्यामुळे इंधन भरायला पेट्रोल पंपावर गेलेल्या नागरिकांना लॅाकडाउनमध्येही इंधनाच्या दराने चांगलाच शॅाक बसला. दरवाढीचा हा झटका नाही नाही म्हणत बसलाच. त्यामुळे सरकारवरील नाराजीत आणखी एका कारणाची भर पडली.
Petrol F
Petrol F

नाशिक : इंधनाच्या दरवाढीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. (Fuel price hike) काल शहरात पेट्रोलचे दर शंभराच्या पुढे गेले. (Petrol cross 100 Rupees) त्यामुळे इंधन भरायला पेट्रोल पंपावर गेलेल्या नागरिकांना लॅाकडाउनमध्येही इंधनाच्या दराने चांगलाच शॅाक बसला. दरवाढीचा हा झटका नाही नाही म्हणत बसलाच.(people got shocked) त्यामुळे सरकारवरील नाराजीत आणखी एका कारणाची भर पडली. 

इंधन दरवाढीवरून गेले आठवडाभर राज्यभर राजकीय पक्षांचे आंदोलने सुरु होते. राष्ट्रवादी कॅाग्रेसने याबाबत प्रतिकात्मक आंदोलन केले होते. काल शहरात इंधनाच्या दरात पेट्रोल १००.१९ रुपये तर डिझेल ९०.६३ रुपये प्रती लिटरवर पोहोचले. पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणूका सुरु असल्याने इंधनाच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. किंबहून दोन वेळा हे दर ८ पैसे कमी झाल्याने त्याच्या बातम्या झळकल्या होत्या. विधानसभा निवडणूका संपल्यावर मात्र दरवाढीला पुन्हा उभारी मिळाली व काल ते शंभरीच्या पार पोहोचले. 

देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले शासकीय योजनांचे होर्डींग्ज आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात काल काही नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र असलेले आणि `पेट्रोल नॅाट आऊट १००, नकोत तुमचे अच्छे दिन` सामान्य नाशिककर असे फलक घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केले.

इंधन दरवाढीचा परिणाम बहुतांश घटकांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे होतो. विशेषतः अनेक पेट्रोलियम उत्पादने तसेच रासायनीक खते यांच्या दराचा त्याच्याशी थेट संबंध आहे. वाहतूक क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. डिझेलचे दर जवळ जवळ पेट्रोलच्या दराइतकेच आहेत. त्यामुळे महागाई व नागरी वाहतूकीच्या दरवाढीवर त्याचा थेट पिरणाम होण्याचा धोका असल्याने सामान्य नागरिकांवर हा भार पडेल. त्यातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. 
.... 
  हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com