नाशिक- सिन्नर टोल प्लाझा विरोधात राष्ट्रवादी आक्रमक !

पुणे महामार्गावरील विविध समस्या व अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या अडचणींबाबत टोल प्लाझा चालविणारी कंपनी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस या प्रश्नावर आक्रमक झाली आहे. येत्या पाच दिवसांत या गैरसोयी दूर न केल्यास ३१ मे पासून उपोषण करण्याची घोषणा अध्यक्ष गणेश गायधनी यांनी केली आहे.
नाशिक- सिन्नर टोल प्लाझा विरोधात राष्ट्रवादी आक्रमक !

नाशिक : पुणे महामार्गावरील विविध समस्या व अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या अडचणींबाबत (inconvinient Accurs accident) टोल प्लाझा चालविणारी कंपनी दुर्लक्ष करीत आहे. (Toll Plaza ignours Management ignore Public Deemands)  त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस या प्रश्नावर आक्रमक झाली आहे. येत्या पाच दिवसांत या गैरसोयी दूर न केल्यास ३१ मे पासून उपोषण करण्याची घोषणा अध्यक्ष गणेश गायधनी (Ganesh Gaidhani) यांनी केली आहे. 

यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी आज टोल कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. विविध समस्यांबाबत चर्चा केली. गेले वर्षभर या विषयावर पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र व्यवस्थापन त्याबाबत टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे पळसे चौफुलीवर गंभीर अपघात झाले आहेत. त्यात आठ जणांना प्राण गमवावे लागले. पथदीप कार्यरत नसल्याने चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. गावातील अनेक महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओरबाडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांत मोठी नाराजी पसरली आहे.  

यासंदर्भात श्री गायधनी म्हणाले, पुणे महामार्गावरील टोलप्लाझा म्हणजे अनेक समस्यांचे केंद्र बनले आहे. या सर्व समस्यांबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अनेकदा आंदोलने केली. त्यामुळे काही कामे झाली. अनेक कामे अद्यापही अपूर्ण राहिली आहेत. त्यात प्रामुख्याने, पळसे गावाच्या प्रवेशद्वारावरील हायमास्ट दिवा बसविल्यापासून अद्याप कार्यान्वित झालेला नाही. तो त्वरीत चालू करावा.  

शिंदे पळसे दरम्यान दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडला मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. त्याची डागडुजी न करता त्वरित व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.  पळसे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी रस्त्यावर विविध गैरसोयी आहेत. त्याबाबत दुरुस्तीची कामे सुरु झाली मात्र ती मध्येच थांबल्याने प्रलंबीत आहे. ही कामे पूर्ण करून तातडीने तिथे लाइटची सोय करणे. बंगाली बाबा ते फुलेनगर दरम्यान पथदीप बसवावेत. 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात आज निवेदन दिले. या सर्व सुविधा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे मागणीद्वारे संस्थेला इशारा देण्यात आला आहे. सर्व प्रलंबित सुविधा व समस्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँगेस तीव्र आंदोलन करील. येत्या ३० मेपर्यंत कार्यवाही न झाल्यास सोमवारी (ता. ३१) पासून उपोषण करण्यात येईल. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस कुमार गायधनी, तालुका अध्यक्ष संदेश टिळे, रामकृष्ण झाडे, अभिषेक गायके, निखिल जाधव आदी उपस्थित होते.
.....

हेही वाचा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com