महापालिकेने स्वतः लस खरेदीला प्राधान्य द्यावे!

शहरात कोरोनाचा प्रसार ज्या वेगाने झाला तो सगळ्यांच्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आगामी काळात हे संकट परतवून लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला पाहिजे. त्यासाठी महापालिकेने केंद्र शासनावर विसंबून न राहता स्वर्चातून लस खरेदी करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्ष सौ अनिता महेश भामरे यांनी केली आहे.
Anita Bhamre
Anita Bhamre

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रसार ज्या वेगाने झाला तो सगळ्यांच्या चिंतेचा विषय आहे. (covid19 spreading in Nashik City Widly) त्यामुळे आगामी काळात हे संकट परतवून लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला पाहिजे. त्यासाठी महापालिकेने केंद्र शासनावर विसंबून न राहता स्वर्चातून लस खरेदी करण्यासाठी (NMc Shall take initiative to Purchase Vaccine) पुढाकार घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्ष सौ अनिता महेश भामरे (Deemands NCP Women wing President Anita Bhamre) यांनी केली आहे. 

त्या म्हणाल्या, शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी अनेक निष्पाप नागरिकांचा बळी त्यात जात आहे. नाशिक महापालिकेने यासंदर्भात स्वतः निविदा काढून लस खरेदीला प्राधान्य द्यावे. यासंदर्भात मुंबई महापालिकेने ग्लोबोल निविदा काढून लस खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील तसे प्रयत्न सुरु आहेत. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नाशिक जिल्ह्याला बेजार केले आहे. यानंतर दोन तीन महिन्यात तिसरी लाट येण्याचा धोका आरोग्य संघटनेने दिला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत चार हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे.  शहरात १७०० पेक्षा अधिक लोकांना मृत्युला सामोरे जावे लागले. कोरोना रोगापासून मुक्त व्हायचे असेल तर केवळ लस हाच रामबाण उपाय आज तरी दिसतो. तेव्हा नाशिक शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता  लस खरेदीला प्राधान्य द्यावे. 

मुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड महानगर पालिका स्थानिक नागरिकांसाठी लस खरेदी करत असेल तर नाशिक महापालिकेने   याबाबतीत तत्काळ निर्णय घेऊन नाशिककरांना दिलासा द्यावा. लसीकरणासाठी लागणारा प्रदिर्घ कालावधीचा विचार करता फार काळ केंद्र आणि राज्य सरकारवर अवलंबून राहू नये.

जे नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना मोफत लस देण्याचा आग्रह सोडून द्यावा. अनेक नागरिकांना खाजगी रुग्णालयांतून लस घेणे शक्य आहे. त्यासाठी काही खाजगी रुग्णालयांत देखील लसीकरणाची सुविधा कायम ठेवावी. आगामी काळात कोरोनाशी लढा यशस्वी द्यायचा असेल तर लसीकरण, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांवर लक्ष ठेऊन त्यांचे विलगीकरण करणे. हे रुग्ण सार्वजनिक तसेच गर्दीत वावरल्यास त्याचा समाजाला व शहराच्या आरोग्य सेवेवरत्याचा ताण येईल. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लवकर सजग व्हावे व आपली यंत्रणा सजग करावी. 
... 
हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com