जून महिन्यात नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चा?

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला जाग आणण्यासाठी राज्यभरात मूकमोर्चे काढण्यात आले. आता पुन्हा एकदा या मोर्चाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जून महिन्यात नाशिकमधून मोर्चा काढण्याचे नियोजन होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. मात्र, यंदाचा मोर्चा ‘मूक’ नसून ‘ठोक’ मोर्चा असू शकेल, अशी शक्यताही सूत्रांनी वर्तविली.
Sambhajiraje
Sambhajiraje

नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला जाग आणण्यासाठी राज्यभरात मूकमोर्चे काढण्यात (Maratha reservation Morcha may be from Nashik) आले. आता पुन्हा एकदा या मोर्चाच्या हालचाली (Movements are on this Issue) सुरू झाल्या आहेत. जून महिन्यात नाशिकमधून मोर्चा काढण्याचे नियोजन होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. मात्र, यंदाचा मोर्चा ‘मूक’ नसून ‘ठोक’ मोर्चा (This Morcha may not be silent) असू शकेल, अशी शक्यताही सूत्रांनी वर्तविली.

या महिन्यात खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा दौरा झाला. त्यानंतर त्यांनी येत्या २७ मेस आपली भूमिका स्पष्ट करू असे जाहीर केले. दरम्यान ५ जूनला बीड येथून मोर्चा काढण्याचे आमदार विनायक मेटे यांनी जाहीर केले आहे. अण्णासाहेब महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील नाशिकमध्ये येत आहेत. हे तिन्ही नेते सध्या राज्य सरकार विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाशी जवळीक असलेले आहेत.

आमदार मेटे यांचे कुटुंबिय सरकारी नोकरीत असून त्यांची सध्या नाशिकला नियुक्ती आहे. त्यामुळे श्री मेटे सातत्याने नाशिकला येत असतात. नाशिकला आल्यावर ते याबाबत आवर्जुन भूमिका मांडतात. अशा स्थितीत नाशिक येथून मोर्चा काढण्याचे नियोजन होऊ शकते.  त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिक पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी शांतता व संयम राखण्याचे आवाहन मराठा समाजाला केले होते. समाजानेही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मात्र, नाशिकमध्ये छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका पहिल्यांदाच आक्रमक दिसून आली. एरवी शांत असलेले छत्रपती संभाजीराजे नाशिकमध्ये आक्रमक का झाले? हा प्रश्न सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना पडला आहे.

हा धागा लक्षात घेता पुढील मोर्चाची रणनीती नाशिकमधूनच आकाराला येऊ शकते, अशी शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. याआधी झालेल्या आंदोलनांमध्ये नाशिकची भूमिकाही महत्त्वाची ठरली आहे. आजपावेतो नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलनात कुठलेही गट न पडता एका दिशेने पार पडली आहे. मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यासाठी हे दौरे महत्त्वपूर्ण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
....

‘जबाबदारी सोपवा, पार पाडू’
‘जबाबदारी सोपवा, पार पाडू’ याबाबत छत्रपती संभाजीराजेंचे निकटवर्तीय असलेले छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांच्याशी चर्चा केली असता, राजेंनी नाशिककरांवर जबाबदारी दिल्यास ती नक्कीच यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे सांगत या बातमीला काहीअंशी नक्कीच दुजोरा दिला.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com