रुग्णालयांनी बेडची वास्तव सख्या न कळविल्यास कारवाई

कोरोनाविषयक नियोजन आणि उपचारांविषयी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यासंदर्भात रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध सुविधा, बेडची वास्तव माहिती प्रशासनाला कळवावी. ती अद्ययावत करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.
Suraj Mandhare
Suraj Mandhare

नाशिक : कोरोनाविषयक नियोजन आणि उपचारांविषयी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. (Administration doing corona treatment and plannig)यासंदर्भात रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध सुविधा, बेडची वास्तव माहिती प्रशासनाला (Hospitals should convey factual information of Beds & Facility) कळवावी. ती अद्ययावत करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी दिला आहे. 

ते म्हणाले, बऱ्याच रुग्णालयांनी अद्यापही महापालिकेकडे त्यांच्या वास्तविक बेडची संख्या नोंदवलेली नाही. आज पोर्टलवर आणि ईमेल द्वारे अतिशय कमी रुग्णालयांकडून रेमडीसिविरची मागणी आलेली आहे. तरी देखील रुग्णालयांची गैरसोय होऊ नये म्हणून पूर्वीची मागणी विचारात घेऊन आज वितरण करण्यात आले आहे. सोमवारपासून मात्र नाशिक मित्र या पोर्टलवर रुग्णालयाची मागणी प्राप्त न झाल्यास रेमडीसिविर इंजेक्शन वितरण करण्यात येणार नाही. कारण केवळ मागणी पुरेशी नसून त्यासोबत रुग्णांचे प्रमाणपत्र सुद्धा शासनाने अनिवार्य केलेले असल्याने मागणी नसताना थेट पुरवठा करणे योग्य होणार नाही. 

जिल्हाधिकारी म्हणाले, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वाटप पारदर्शी व समन्यायी पद्धतीने करणे सुलभ पद्धतीने व्हावे याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे nashikmitra.in या पोर्टलवर रेमडेसिव्हिर  रजिस्ट्रेशन मध्ये रूग्णालय आस्थापनांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. अनेक रूग्णालय आस्थापनांनी सदर संकेत स्थळावर नोंदणी केलेली नाही असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या वैद्यकिय आस्थापनांनी अद्याप या संकेतस्थळावर आपल्या आस्थापनेची नोंदणी केली नसेल, त्यांनी त्वरीत नोंदणी करून दैनंदिन मागणी नोंदवावी.

या संदर्भात यांनी दिलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्राकात म्हटले आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे रुग्णालयांना जिल्ह्यातील वितरकांमार्फत  रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वाटप दररोज करण्यात येत असते. याकरीता रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांची संख्या व त्यातील रेमडेसिव्हिर  इंजेक्शनची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या व त्याबाबतचे विहित प्रमाणपत्र रोज या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे.

यापूर्वी ही कार्यवाही ई-मेल द्वारे होत होती परंतु इमेलवर खाजगी व्यक्ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर अनावश्यक ईमेल करीत असल्यामुळे या ईमेल एड्रेस वरून रुग्णालयांची मागणी शोधणे अत्यंत वेळखाऊ झालेले असल्याने या कामासाठी पोर्टल विकसित करण्यात आले आहे.  त्याआधारे त्यामुळे रुग्णालयांना देखील माहिती नोंदवणे सोपे होणार आहे व त्याआधारे रेमडेसिव्हिर चे समन्यायी व पारदर्शकपणे वितरण करण्यात येईल.  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com