खाजगी हॉस्पिटलची लूट थांबवण्यात राजेश टोपे सपशेल अपयशी

मोठ्या हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या रुग्णांच्या लुटीबाबत नाशिकमध्ये आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे आणि ऑपरेशन हॉस्पिटल यांनी चालवलेल्या चळवळीला जनमानसातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. या लुटीच्या विरोधामध्ये त्यांनी आपले कपडे काढले. श्री. भावेंच्या गांधीगिरीचा हा व्हिडीओ अडीच कोटीहून जास्त लोकांपर्यंत पोहोचला, असा दावा पक्षाचे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी केला.
AAP
AAP

नाशिक : मोठ्या हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या रुग्णांच्या लुटीबाबत नाशिकमध्ये आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे आणि ऑपरेशन हॉस्पिटल यांनी चालवलेल्या चळवळीला जनमानसातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. या लुटीच्या विरोधामध्ये त्यांनी आपले कपडे काढले. श्री. भावेंच्या गांधीगिरीचा हा व्हिडीओ अडीच कोटीहून जास्त लोकांपर्यंत पोहोचला, असा दावा पक्षाचे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी केला. 

ते म्हणाले, या आंदोलनाची राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. त्याचे परिणाम स्वरूप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या मनमानीला चाप लावण्याचा निर्णय घ्यावा लागला. खाजगी हॉस्पिटलसाठी कोविड उपचाराकरिता नवीन दरपत्रक घोषित केले. हा या आंदोलन, ऑपरेशन हॉस्पिटलच्या चळवळीचा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेने दिलेला प्रचंड पाठिंब्याचा विजय आहे. 

ते म्हणाले, जेव्हा राज्य सरकार, प्रशासकीय यंत्रणा रुग्णांची ही लूट थांबवण्यात अपयशी झाले तेव्हा आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते भावे यांच्यासारख्या तळमळीच्या कार्यकर्त्यांकडे लोकांनी धाव घ्यायला सुरवात केली. त्यातून ऑपरेशन हॉस्पिटल नावाची चळवळ जन सहभागातून शहरामध्ये उभी राहिली. ही चळवळ आता आम आदमी पक्ष महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये नेणार आहे. लोकांची बेकायदेशीर पद्धतीने लूट करणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थापन विरुद्धचा हा संघर्ष आता पेटला असून यामध्ये आम आदमी पक्ष सामान्य जनतेच्या आणि प्रामाणिक डॉक्टरांच्या बाजूने उभा राहिलेला आहे. ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा आमचा मनोदय आहे.

या चळवळीच्या दणक्यामुळे नाशिकमधील  खाजगी हॉस्पिटल्स व्यवस्थापनामध्ये खळबळ माजली असून काहींनी कोविड उपचार करण्यास नकार देण्याची भूमिका घेतली होती असा दावा त्यांनी केला. याला बळी न पडण्याचा आग्रह पक्ष राज्य सरकारकडे करीत आहे. घोषित केलेल्या नवीन दर पत्रक नियमानुसार सर्व राज्यभर कठोरपणे राबवले जावे अशी मागणी त्यांनी केली. 

...
राजेश टोपे अयशस्वी
"हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आम आदमी पक्षाने आभार मानले. परंतु त्याच वेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना खाजगी हॉस्पिटलच्या आत्तापर्यंत चाललेल्या मनमानी कारभाराला आळा घालण्यामध्ये अपयश आले. त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेले एक वर्षभर मोठी कोविड हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणावर रुग्णांना रडवत आहेत. त्यांच्याकडून नियम डावलून खूप जास्त बिले वसूल करत आहेत. हे रोखण्याचं काम राज्याच्या आरोग्य विभागाचे आहे. परंतु त्यात त्यांना अपयश आलं आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी आरोग्य मंत्री टोपे यांची आहे", अशी टीका पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केली. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com