गुड न्यूज... नाशिक शहरात उद्यापासून अनलॅाक प्रक्रीया

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपासून सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि खाटांची उपलब्धता याचा विचार करून घेण्याचे स्वातंत्र्य शासनाने दिले होते. त्यानुसार रेड झोनमधून बाहेर पडलेल्या नाशिक शहर व जिल्ह्यात हॉटेल, दारु आणि मिठाईची दुकाने वगळता इतर सगळी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यत खुली राहणार आहेत.
Bhujbal Chhagan
Bhujbal Chhagan

नाशिक : ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपासून सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, (State Government policy for break the chain) जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि खाटांची उपलब्धता याचा विचार करून घेण्याचे स्वातंत्र्य शासनाने दिले होते. (Free Hand for city, District lavle) त्यानुसार रेड झोनमधून बाहेर पडलेल्या नाशिक शहर व  जिल्ह्यात हॉटेल, दारु आणि मिठाईची दुकाने वगळता इतर सगळी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यत (Shop will remain Open 7 to 2 pm) खुली राहणार आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात, नाशिक जिल्हा रेड झोन बाहेर असल्याने उद्या मंगळवार (ता.१) जूनपासून लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय झाला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे आदीसह विविध विभागाचे वरिष्ठ आधिकारी यावेळी उपस्थित होते.

नाशिक येलो झोनमध्ये 
कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये जिवनाश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सकाळी ७ ते ११ या वेळेऐवजी सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील. दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील. कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालयांत २५ टक्के कर्मचारी उपस्थितीसह सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर त्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. कृषि-विषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांत दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी दुकानांच्या वेळा वाढविता येतील. .

अत्यावश्यक सेवा...
सरसकट सगळी दुकान सकाळी ७ ते दुपारी २ पर्यत खुली राहणार
भाजी मार्केट बंद पण सध्या नेमून दिलेल्या जागेवार विक्री होईल
दूध विक्री सध्या स्थितीत आहे तशीच सुरु राहील.
स्वस्‍त धान्य दुकान शिवभोजन थाळी वितरण पार्सल द्वारे सुरु
अंत्यविधीसाठी कमाल २० तर त्यानंतरच्या विधीसाठी १५ जण
विकेंड लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवेसाठीच परवानगी राहिल

अत्यावश्यक नसलेल्या सेवा... 
बस,रिक्षा, टॅक्सी,चारचाकी वाहनांना परवानगी
बॅका, पतसंस्था सकाळी ९ ते दुपारी २ पर्यत सुरु
बांधकाम क्षेत्राची ठिकाण (साईटवरील कामकाज)
शैक्षणिक साहित्य,वह्या पुस्तके स्टेशनरीची दुकान
हार्डवेअर, गॅरेज, घर दुरुस्ती, इलेक्‍ट्रीक दुकान
ई कॉमर्स वस्तूंची विक्री सुरु राहील
मुद्रांक दस्त नोंदणीचे कामकाज सुरु राहील.

यावर प्रतिबंध कायम...
रात्री दहा ते सकाळी सहा पर्यत नाईट कर्फ्यु
शाळा, महाविद्यालय, खासगी क्लास बंद
दारु दुकान सुरु करण्यास प्रतिबंध,
हॉटेल, धाबे, मिठाई दुकानांना प्रतिबंध,
दुपारी ३ ते सायंकाळी ६ फिरण्यास मनाई,
 विवाह, स्वागत समारंभ,लॉन्स बंद,
सिनेमागृह, तरणतलाव, नाट्यगृह, सभागृह बंद,
क्रिडांगण, पार्क, उद्यान, मोकळ्या जागा बंद
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com