डिझेल दरवाढीमुळे भाजपने १७० कोटींचे कंत्राट ३५४ कोटींवर नेले! - Garbage tender rise from 160 cr to 354 cr, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

डिझेल दरवाढीमुळे भाजपने १७० कोटींचे कंत्राट ३५४ कोटींवर नेले!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 जुलै 2021

सातत्याने होणारी डिझेल व इंधन दरवाढीने सामान्यांच्या खीशाला झळ बसते. मात्र एरव्ही दरवाढीचे समर्थन करणाऱ्या भाजपने आपली सत्ता असलेल्या महापिलेकत घंटागाडीचे कंत्रात १६० कोटींवर थेट ३५४ कोटींवर नेले.  त्याचे कारण डिझेल दरवाढ आहे, असे समर्थन देखील केले आहे.   

नाशिक : सातत्याने होणारी डिझेल व इंधन दरवाढीने सामान्यांच्या खीशाला झळ बसते. (Fuel price hike common people) मात्र एरव्ही दरवाढीचे समर्थन करणाऱ्या भाजपने (BJP always supporting fuel price hike) आपली सत्ता असलेल्या महापिलेकत घंटागाडीचे कंत्रात १६० कोटींवर थेट ३५४ कोटींवर नेले. (Now Garbage tender hoked from 160 to 354 crores) त्याचे कारण डिझेल दरवाढ आहे, असे समर्थन देखील केले आहे.   

स्वच्छ व सुंदर नाशिकचे ब्रीद कायम ठेवण्यासाठी घरोघरी कचरा संकलनाच्या मोहिमेला डिझेल दरवाढीमुळे आर्थिक झटका बसला आहे. तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांच्या वर म्हणजे दुप्पट रक्कम ठेकेदारांना अदा करण्यासाठी साडेतीनशे कोटींच्या खर्चावर कुठलीही चर्चा न करता जादा विषयात प्रस्ताव मंजूर केल्याने निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले आहे.

घराघरांतून घनकचरा संकलित करण्यासाठी महापालिकेकडून घंटागाडी उपक्रम राबविला जातो. २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नगरसेवकांची ठेकेदारी मोडीत काढण्याच्या उद्देशाने प्रभागनिहाय ऐवजी विभागनिहाय ठेके काढले. त्यावेळी नगरसेवकांमध्ये आयुक्तांविरुद्ध पोटशूळ उठले होते. त्या ठेक्याची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी पुढील पाच वर्षासाठीच्या नवीन ठेक्याला प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी मागील आठवड्यात झालेल्या महासभेत घनकचरा विभागाकडून प्रस्ताव ठेवला, परंतु चर्चा होण्यासाठी नियमित विषयाऐवजी जादा विषयांमध्ये प्रस्ताव सादर करण्यात आल्याने सत्ताधारी भाजपला टीकेला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.

डोळे विस्फारणारी वाढ
पाच वर्षासाठी घंटागाडीचा एकूण खर्च १७५ कोटी रुपये गृहीत धरण्यात आला होता. त्यात सन २०१७ मध्ये सुमारे ३० कोटी रुपये देयके अदा करण्यात आली. सन २०१८ मध्ये सुमारे ३४ कोटी रुपये अदा करण्यात आले. सन २०१९ मध्ये सुमारे ४० कोटी रुपये अदा केले. सन २०२० मध्ये सुमारे ४२ कोटी, तर सन २०२१ मध्ये चार महिन्यात सुमारे पंधरा कोटी रुपये अदा करण्यात आले.

गेल्या साडे चार वर्षात ८, ६१, ५२५ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. त्याबदल्यात १६० कोटी रुपये देयके अदा करण्यात आले. डिसेंबरपर्यंत साधारण १७० कोटी रुपयांपर्यंत खर्च होण्याचा अंदाज आहे. परंतु, पुढील पाच वर्षासाठी घंटागाडीचा ठेका देताना दुप्पटीपेक्षा अधिक वाढ म्हणजे ३५४ कोटी रुपयांचा ढोबळ प्रस्तावाला मंजुरी दिली. जादा विषयात प्रस्ताव मंजूर करताना महापौर सतीश कुलकर्णी यांची तब्येत बिघडल्याने तत्कालीन पीठासन अधिकारी व सभागृह नेते कमलेश बोडके यांनी सभेचे कामकाज आटोपते घेतल्याने चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले.

किंमत वाढण्याची दिली ही कारणे
घंटागाडीच्या दरवाढीसाठि विविध कारणे सभापतींनी दिली आहेत. यामध्ये डिझेलच्या दरात ४९ टक्के वाढ, मागील ठेक्यात ५० तर पुढील ठेक्यात ९६ रुपये प्रतिलिटर डिझेल दर आहे. शहरात नवीन वसाहत वाढत आहेत. घंटागाडी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन वाढले, कामगारांना वीस टक्के वेतन वाढ,  नवीन घंटागाड्यांची किंमत वाढली, दहा वर्षात शहराची लोकसंख्या २२ लाखांपर्यंत पोचल्याचा अंदाज आणि २०२६ पर्यंत २४ लाख लोकसंख्या वाढीचा अंदाज असल्याने  कचरा संकलनात प्रतिदिन २०२४ पर्यंत ८२२ मेट्रिक टन वाढीचा अंदाज आहे.
...

हेही वाचा...

बच्चू कडू यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख