बच्चू कडू यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! - File a case of homicide against minister Bacchu kadu, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

बच्चू कडू यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 जुलै 2021

सोनार समाजातील व दोन्ही कुटंबियांच्या सहमतीन होऊ घातलेल्या दिव्यांग मुलीच्या आंतरधर्मीय विवाहास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाठींबा दिला होता. त्याच्या निषेधार्थ आज सराफ बाजारात निदर्शने झाली. 

नाशिक : सोनार समाजातील दिव्यांग मुलीच्या होऊ घातलेल्या आंतरधर्मीय विवाहास राज्यमंत्री बच्चू कडू (Minister Bacchu kadu supprts family for inter religious marrige) यांनी पाठींबा दिला होता. त्याच्या निषेधार्थ आज सराफ बाजारात निदर्शने झाली. (Sonar community protest against this Bacchu kadu) श्री. कडू यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, (They deemand to file a case of homicide against kadu) त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

आज सराफ बाजारात सर्वशाखीय सुवर्णकार समाजातर्फे आंदोलन झाले. यावेळी पदाधिकारी म्हणाले, बच्चू कडू यांनी नाशिक येथे संपूर्ण हिंदू सुवर्णकार समाजाबददल केलेल्या वक्तव्यामुळे समाजाची बदनामी झाली. श्री. कडूंच्या वक्तव्यामुळे व्यथीत होऊन समाजातील तरुण, तळमळीचे समाजबांधव ह.भ.प. सुनिल मधुकर माळचे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.  त्यामुळे राज्यमंत्री कडू यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. श्री. कडू यांनी माध्यमांसमोर जाहीर माफी मागावी. त्यांनी तात्काळ राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. 

याबाबत ते म्हणाले येथील सुवर्णकार समाजातील व्यावसायिकाच्या मुलीचा आंतरधर्मीय विवाह होणार होता. यासंदर्भात महाराष्ट्र श्री. कडू यांनी आडगांवकर कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन सदर प्रकरणाची एकतर्फी माहिती घेतली. रसिका हिला सोनार समाज स्विकारीत नसल्याने आडगांचकर कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे असे धादांत खोटे विधान केले. याबाबत समाजाने रसिकासाठी वेळोवेळी चांगली स्थळे दाखविली होती. मात्र आडगांवकर कुटुंबीयांनी सातत्याने सर्व स्थळाना नकार दिलेला आहे. रसिकासाठी दाखविलेल्या समाजातील तरुणांना आम्ही समोर आणण्यास देखील तयार आहोत. असे असताना श्री. कडू यांनी जबाबदारीने वागणे आवश्यक होते. मात्र तसे न करता एकतर्फी माध्यमांना माहिती दिली. 

यावेळी श्री कडू यांनी सोनार समाजाला टिकेचे लक्ष्य कले. हीन दर्जाची वक्तव्ये करीत आगपाखड केली. नालायक, पाखंडी, अधर्मी, चांडाळ चौकडी, तिकडे जाऊन मरा ना, षंढ असे राज्यमंत्र्यांना न शोभणारी व चीड येईल अशी वक्तव्ये केली. ते सहन न झाल्याने महाराष्ट्र लाड सुवर्णकार समाज संस्थेचे विश्वस्त ह.भ.प. माळवे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने अकाली मृत्यू झालेला आहे. त्याला बच्चू कडू जबाबदार आहेत. 
...
हेही वाचा...

आदिवासी विकास खाते माझ्याकडेच राहील!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख