पोलिस आयुक्त दीपक पांडे रोजच करतात `गोदावरी`त स्नान!

गोदावरीची अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महती विख्यात आहे. जगभरातून तीचे तीर्थ पूजण्यास लोक येतात. मात्र तीची दक्षिणगंगा गोदावरीच्या महतीचा कृतीशील संदेश देण्याचे काम येथील पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला, तो गत आठ महिने ते नित्य गोदावरीत स्नानातून!
Pande snan
Pande snan

नाशिक : गोदावरीची अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महती विख्यात आहे. (Godawari`s spiritual, social, cultural & econocical importance knows everyone)  जगभरातून तीचे तीर्थ पूजण्यास लोक येतात. (Devotee from all over world came for worship) मात्र तीची दक्षिणगंगा गोदावरीच्या महतीचा कृतीशील संदेश देण्याचे काम येथील (Practical massage given by commissioner) पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak pandey)  यांनी दिला, तो गत आठ महिने ते नित्य गोदावरीत स्नानातून!

गोदावरी प्रदूषण घसा कोरडा होईपर्यंत सांगणारे अनेक दिसतात. तीचे पावित्र्य, निर्मळता जपण्यासाठी फार थोडे पुढे येतात. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सलग आठ महिन्यांपासून दररोज गोदावरीत स्नान करून तीच्या महतीचा कृतीशील संदेश दिला आहे. त्यामुळे ही बातमी वाचली तर आश्चर्यचकीत नक्की व्हाल याची गॅरंटी.

गोदावरी नुसतीच नदी नाही तर, कोट्यवधी जीवांची ती जीवनदायीनी आहे. अशा पावन गोदावरीकाठी अनादी काळापासून समृद्ध संस्कृती फुलली. ‘गंगे च्‌ यमुने चैव गोदावरी सरस्वति.. नर्मदे सिन्धु कावेरि जलऽस्मिन्सन्निधिं कुरु...’ म्हणून लाखोंच्या हृदयात गोदावरीबद्दल श्रद्धा आहे. या सश्रद्ध भावनेस नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेही जागले. ते तब्बल ८ महिन्यांपासून रोज पहाटे गोदावरीत स्नान करतात. त्यांच्या या श्रद्धेपासून प्रेरणा घेत महादेवपूरच्या ग्रामस्थांनी गोदावरी स्वच्छतेचा संकल्प सोडला आहे.

गोदावरीप्रती श्रद्धा असलेल्यांची यादी भली मोठी आहे. यात आता नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक शिवानंद पांडे हे एक नाव जोडले गेले आहे. त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वतावर उगम झाल्यापासून  तर तेलंगणातील राजमेंद्री येथे बंगालच्या महासागराशी संगम होईपर्यंत ती दिड हजार मैल खळाखळत वाहते. तीच्या काठावर हजारो मंदिरे, तीर्थस्थळे, शहरे, संस्कृती, परंपरा विकसीत झाल्या. वाढल्या. तीच्या स्पर्शाने सगळ्यांना श्रीमंती बहाल झाली. मात्र जीथे जीथे ती जाते तीथे स्थानिकांकडून तीला ओरबाडण्या पलिकडे काही होत नाही. त्यामुळे तीच्यावरील निस्सीम श्रद्धा, प्रेमाने तीला अराध्य करणारे फार थोडे. त्यात भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ पदावरील आयुक्त दीपक पांडे एक.

सलग आठ महिन्यांपासून ते त्यांच्या श्रद्धेची अनुभूती महादेवपूरवासीय घेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सरपंच विलासराजे सांडखोरे यांच्यासह ग्रामस्थांनी शनिवारी स्नानाला आलेले आयुक्त पांडे व त्यांचे वडील शिवानंद पांडे यांची सदिच्छा भेट घेत छोटेखानी सत्कार केला. 

...
ग्रामस्थांचा संकल्प 
पोलिस आयुक्त पांडे यांनी ग्रामस्थांना गंगास्नानाचे महत्व व पावित्र्याविषयी प्रबोधन केले. महादेवपूर गावाला लाभलेला गोदावरीचा किनारा व भोवतालच्या निसर्गरम्य वातावरणाचे महत्व पटवून देतानाच, त्यांनी रोज गंगास्नानाची इच्छा ग्रामस्थांसमोर मांडली. सरपंच श्री. सांडखोरे व त्यांचे युवा सहकारी सध्या महादेवपूर गावात नेतृत्व करीत आहेत. त्यांनी पोलिस आयुक्तांच्या कृतीशील श्रद्धेतून प्रेरणा घेत गावात स्वच्छता करतानाच नदीपात्र प्रदूषित होणार नाही, ते कायम स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प सोडला आहे. 

....
श्री. पांडे यांना शासनाच्या बंगल्यात अनेक सुविधा असताना ते पवित्र गोदावरीत स्नान करायला येतात, ही बाब गोदाकाठच्या नाशिककरांसाठी अभिमानास्पद आहे. वरिष्ठ आधिकारी जेव्हा स्वत:च्या कृतीतून गोदावरीप्रती श्रद्धेचे आचरण करतात, तेव्हा त्यांचा आदर्श घेऊन आम्ही महादेवपूर ग्रामस्थांनी स्वच्छतेसह नदीस्वच्छतेचा संकल्प सोडला आहे. 
- विलासराजे दत्तू सांडखोर, सरपंच, महादेवपूर  
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com