भुजबळांशी वाद घालून सुहास कांदे यांनी कोणाची कोंडी केली?

काल दिवसभर नांदगावच्या वादळी शासकीय आढावा बैठकीची. या बैठकीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचे स्थानिक आमदार सुहास कांदे यांनी वाद घातला. असा वाद घातल्याने श्री. कांदे यांची राजकीय प्रतिमा उजळणार की भुजबळांची उंची कमी होणार आहे?.
Bhujbal- Kande
Bhujbal- Kande

नाशिक : काल दिवसभर नांदगावच्या वादळी शासकीय आढावा बैठकीची. (Givernment`s Nandgaon review meeting) या बैठकीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याशी शिवसेनेचे स्थानिक आमदार सुहास कांदे (Suhas kande) यांनी वाद घातला. (Dispute between kande & Bhujbal)  असा वाद घातल्याने श्री. कांदे यांची राजकीय प्रतिमा उजळणार की भुजबळांची उंची कमी होणार आहे?. एक मात्र भविष्यात आमदार कांदे यांचीच कोंडी होणार नाही ना? हे लवकरच स्पष्ट होईल.

नांदगाव तालुक्यात दोन महत्त्वाची सत्ता केंद्र आहेत. एक नांदगाव आणि दुसरे मनमाड. या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्याची तयारी जोरात सुरु आहे. त्यात माजी आमदार पंकज भुजबळ पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. ही तयारी म्हणजे आमदार कांदे यांच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न आहेत. श्री. कांदे काय आणि भुजबळ दोघेही नांदगाव बाहेरचे आहेत. त्यांना स्थानिक पातळीवर कोणाचा, किती पाठींबा मिळेल यावर दोघांचेही राजकारण अवलंबून आहे. 

यामध्ये श्री. कांदे यांची पार्श्वभूमी विचारात घेतली, तर ते आमदार झाले, त्यानंतर त्यांची लोकप्रियता घटली की वाढली हे येत्या निवडणूकीत दिसेल. त्यांच्याबाबत अनेक आक्षेप देखील आहेत. त्यामुळेच लोकांमध्ये त्यांचे स्थान, चर्चा कायम राहील ही त्यांची राजकीय गरज आहे. त्यासाठीच त्यांनी आपला मुक्काम नाशिकहून नांदगावला हलवला. 

माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यावर कोणाचाही व्यक्तीगत राग, नाराजी दिसलेली नाही. आमदार कांदे यांच्या मनातील ही राजकीय खदखद कालच्या बैठकीत दिसून आली. त्यासाठी आमदार कांदे यांनी पूरग्रस्तांच्या विशेष निधीची ढाल केली, अशी चर्चा पुढे येत आहे.

आमदार कांदे खरोखर विशेष निधीच हाव असेल, तर ते सत्ताधारी शिवसेनेचे आमदार आहेत. सरकार व मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. अगदी शेजारच्या मतदारसंघात शिवसेनेचे दादा भुसे कृषीमंत्री आहेत. त्यांच्याशी देखील ते संपर्क करू शकत होते. जिल्हाधिकारी काम करीत नसतील तर त्यांची तक्रार करू शकत होते. मात्र आढावा बैठकीत जनहिताचे निर्णय पदरात पाडून घेणे, निष्क्रीय यंत्रणा व त्रुटी पुढे आणून त्यावर तोडगा काढता आला असता. त्यांनी तसे केले नाही. ते भांडण म्हणजे राजकीय व मतदारसंघाच्या प्रश्नांवरच कोणत्याच अँगलमधून दिसत नव्हते. श्री. कांदे यांनी सार्वजनिक ठिकाणी कसे वर्तन, संवाद हवा याचा अनुभव घेण्याची गरज आहे, हे स्पष्ट करणारे होते, अशी उपस्थितांची प्रतिक्रीया होती.  

पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात अतिवृष्टीच्या मिळणाऱ्या आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी झाल्याने त्याचे पडसाद राष्ट्रवादी - शिवसेना अशा पक्षीय पातळीवर पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. निमित्त वरकरणी काहीही असले तरी कळीचा मुद्दा हा आपापल्या राजकीय अस्तित्व लावून धरण्याशी निगडित आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातील बेबनाव येथील विधानसभा मतदारसंघात प्रभुत्व कुणाचे यावरून धुमसत असलेल्या संघर्षाची ठिणगी आपत्कालीन निधीच्या निमित्ताने बाहेर आली. पालकमंत्री भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांचा आमदार सुहास कांदे यांनी पराभव केल्यामुळे राष्ट्रवादीत ही अस्वस्थता अनेक दिवसापासून आहे. मात्र, राज्याच्या महाआघाडीच्या राजकारणात शिवसेना - राष्ट्रवादी संयुक्त सरकारात असल्याने गेल्या दोन वर्षात धुमसत असलेला छुपा संघर्ष अशा रीतीने बाहेर आला. 

यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतही एकदा अशीच भुजबळ - आमदार कांदे यांच्यात निधीच्या मुद्द्यावरून ठिणगी उडाली होती. त्यानंतर त्याच प्रकारची पुनरावृत्ती शनिवारी बघावयास मिळाली. आता हा संघर्ष कुठल्या वळणाने जाणार, हे नजीकच्या काळात अधिक स्पष्ट होणार आहे. नांदगाववर आपली पकड सैल होऊ नये, यासाठी आमदार सुहास कांदे सतर्क राहत असल्याचे लक्षण म्हणून यासर्व प्रकाराकडे बघितले जात आहे. तर पंकज भुजबळ यांचे प्रोजेक्शनसाठी नव्या राजकीय व्युव्हरचना आखून प्रयत्न होत असल्याचेही दिसून आले आहे. 

आपापल्या अस्तित्व राखण्याच्या लढाईत या अशा पद्धतीने चित्र समोर आल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक बनलेत. त्यांनी बैठक संपल्यावर पालकमंत्री भुजबळ यांच्या पुढ्यातच घोषणाबाजी करीत आम्ही मागे हटणार नाहीत, याची चुणूक दाखविली. या प्रकाराचे पडसाद शिवसेना व राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेते मंडळी कसे बघतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यताच अधिक आहे.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com