पोलिस अधीक्षकांची बदली रोखण्यासाठी भुजबळ लागले कामाला! 

त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड नाराजी पसरली आहे.
Dissatisfaction in Nashik district due to transfer of SP Patil  .jpg
Dissatisfaction in Nashik district due to transfer of SP Patil .jpg

नाशिक : राज्य सरकारने नुकत्याच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्य केल्या आहेत. गृह विभागाने 37 आयपीएस अधिकार्‍यांसह 54 पोलिस उपायुक्त किंवा अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि तब्बल 92 सहाय्यक आयुक्त (पोलिस उप अधीक्षक) दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. यात प्रामुख्याने नाशिक (Nashik), औरंगाबाद, नागपूर, धुळे, उस्मानाबाद आणि नंदुरबार या सहा जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक बदलून तेथे नवीन अधिकारी देण्यात आले आहेत. नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांची नियुक्ती होऊन एक वर्षच झाले असताना त्यांच्या जागी शहाजी उमाप यांना नेमण्यात आले आहे. (Dissatisfaction in Nashik district due to transfer of SP Sachin Patil) 

सचिन पाटील यांची अवेळी झालेली बदली अन्यायकारक असून जिल्हाभर तीव्र प्रतिक्रीया उमटत असून निर्माण झालेला असंतोष थांबविण्यासाठी ही बदली रद्द करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. पुन्हा एकदा याबाबत त्यांना स्मरण देणार असल्याचे आश्वासन पालक मंत्री छगन भुजबळ यांनी शिष्टमंडळाला दिले.

अवघ्या दहा अकरा महिन्यात पाटील यांची बदली झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेत सरकारच्या भुमिकेवर शंका झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड नाराजी पसरली आहे. समाज माध्यमांवर जिल्ह्यातील जनतेने ही बदली रद्द व्हावी यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. एकूणच जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त होत असलेला असंतोष सामाजिक वातावरण गढूळ करण्यास निमित्त ठरू शकते. हे लक्षात घेऊन हीबदली थांबली पाहीजे, असा निरोप यापुर्वीच मुख्यमंत्र्यांपर्यंत स्वतः पोहचविला आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. 

आता आपले हे निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करील असे आश्वासन भुजबळ यांनी 'आम्ही सारे शेतकरी सामान्य नाशिककर' या विचारपीठाखाली एकत्र आलेल्या शिष्टमंडळाला दिले आहे. जिल्ह्यातील शेतकरी आणि अन्य सामाजिक नेतृत्वाखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही या मोहीमेत सहभागी होऊन जिल्ह्याला गुन्हेगारी कारवायांपासून वाचविण्याचे आवाहन केले आहे.  

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com