आमदार फरांदेंनी आरोग्य विभाग नव्हेमहापौर कार्यालयाला टाळे ठोकावे!

शहरात विविध आजारांचा फैलाव व तक्रारींमुळे भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा आमदार देवयानी फरांदे यांनी दिला आहे.
Devyani Pharande
Devyani Pharande

नाशिक : शहरात विविध आजारांचा फैलाव व तक्रारींमुळे (Complains about health department) भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाला टाळे (Lock) ठोकण्याचा इशारा आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांनी दिला आहे. त्यामुळे राजकारण (Politics) चांगलेच तापले. शिवसेनेने (Shivsena) आरोग्य विभाग नव्हे तर महापौर (Mayor) कार्यालयालाच टाळे ठोकावे असा, उपरोधीक सल्ला दिल्याने खळबळ उडाली आहे. 

शहरात गेल्या पाच वर्षातील डेंगी, चिकूनगुनिया आजाराने उच्चांकी संख्या गाठल्याने पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आरोग्य विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिला. फरांदे यांच्या पावित्र्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजप मात्र अडचणीत सापडला असून, प्रशासनावर अंकुश नसल्याची बाब स्पष्ट होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. 

कोरोना तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू असताना डेंगी व चिकूनगुनिया आजाराने तोंड वर काढले आहे. महापालिकेकडे प्राप्त होणाऱ्या आकडेवारीपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंगी व चिकूनगुनियाचे रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात औषधांची फवारणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात शहरात ३११ नागरिकांना डेंगीचा बाधा झाली होती, तर चिकूनगुनियाचे २१० रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात १४० डेंगीचे रुग्ण आढळले. चिकूनगुनियाचे ९५ रुग्ण आढळले. मागील पाच वर्षात सर्वाधिक डेंगी व चिकूनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. 

१ जानेवारी ते १४ सप्टेंबर या कालावधीत ७१७ डेंगीचे तर ५३७ चिकूनगुनियाचे रुग्ण आढळले. गेल्या पाच वर्षातील ही सर्वाधिक आकडेवारी असल्याची बाब समोर आल्यानंतर डेंगीवर खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आरोग्य विभागावर ताशेरे ओढले. आ. फरांदे यांनी आयुक्त कैलास जाधव यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचून डेंगीचा प्रसार होत आहे. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. धूर व औषध फवारणी ठेकेदाराकडून योग्य काम होत नसल्याने आजार बळावत आहे. 

ठेक्यासाठी दिलेली बेकायदेशीर मुदतवाढ रद्द करून पेस्ट कंट्रोल ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून नवीन ठेकेदार नियुक्त करावा. त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असताना आरोग्य विभाग निद्रिस्त आहे. आरोग्य विभागाकडे डेंगी, चिकूनगुनिया बाधित रुग्णांची व या आजाराने मृत झालेल्या रुग्ण संख्येची माहिती नाही, ही बाब आश्‍चर्यकारक आहे. आजारासंदर्भात माहिती देण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइनची मागणी आमदार फरांदे यांनी केली. 

यासंदर्भात महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते म्हणाले, भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आमदार फरांदे यांनी डेंगी व चिकूनगुनियाच्या मुद्यावरून प्रशासनावर निशाणा साधला असला तरी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असल्याने भाजप अडचणीत आला आहे. आजार वाढण्यास महापालिकेतील सत्ताधारी भाजपदेखील जबाबदार आहे. आरोग्य विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा म्हणजे सत्ताधारी भाजपच्या अपयशाची कबुली आमदार फरांदे यांनी दिली आहे. त्यामुळे फक्त आरोग्य विभाग नव्हे तर महापौर कार्यालयालाही टाळे ठोकावे, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com