धुळ्याच्या महापौरपदी भाजपचे प्रदीप कर्पे 

धुळे महापालिकेच्यामहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे प्रदीप कर्पे यांनी ७४ पैकी ५० मते मिळवून निवड झाली. पक्षाचे सर्व ५० मते त्यांना मिळाली. त्यामुळे पक्षात फूट पडणार या चर्चेला विराम मिळाला.
Dhule BJP Karpe
Dhule BJP Karpe

धुळे : धुळे (Dhule) महापौरपदी (Mayor) भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदीप कर्पे (Pradeep Karpe) यांनी ७४ पैकी ५० मते मिळवून निवड झाली. (He got 50 votes) पक्षाचे सर्व ५० मते त्यांना मिळाली. त्यामुळे पक्षात फूट पडणार या चर्चेला विराम मिळाला. त्यामुळे ही निवड जाहीर झाल्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

ऑनलाइन निवडप्रक्रिया राबविण्यात आली. यात ओबीसी संवर्गासाठी आरक्षित महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून एकमेव प्रदीप कर्पे उमेदवारी दिली होती. त्यांच्या पाठीशी ७३ पैकी भाजपच्या ५० नगरसेवकांचे पाठबळ आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकताच शिल्लक होती. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून भाजपने आपल्या ५० पैकी ४४ नगरसेवकांना पर्यटनासाठी सिल्वासाला नेले होते. त्या नगरसेवकांनी तेथून, तर उर्वरित उमेदवारांसह सहा नगरसेवकांनी धुळ्यातून ऑनलाइन मतदान केले.  

भाजपचे उमेदवार कर्पे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती संजय जाधव, नंदू सोनार, सुमनबाई वाघ, अमोल मासुळे, असे सहा सदस्य धुळ्यातील एका ठिकाणाहून ऑनलाइन मतदान करतील. भाजपचे चंद्रकांत सोनार यांचा अडीच वर्षांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर पुढील अडीच वर्षांच्या महापौर निवडीसाठी शुक्रवारी निवडप्रक्रिया राबविली जात आहे. सत्ताधारी भाजपकडून कर्पे, विरोधी काँग्रेसकडून पिंजारी मदिना समशेर, अपक्ष म्हणून मोमीन आसिफ इस्माईल, शिवसेनेकडून ज्योत्स्ना पाटील, एमआयएमतर्फे अन्सारी सईदा मो. इक्बाल यांनी अर्ज सादर केला आहे. तत्पूर्वी, विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपचे नाराज १७ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करत खेळी खेळली होती. त्यामुळे भाजपमध्ये चलबिचल होईल आणि त्याचा लाभ उठविता येईल, असा विरोधकांचा प्रयत्न होता. मात्र, भाजपचे विरोधक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, समाजवादी पक्ष व अपक्षांमध्ये एकमत दिसून आले नाही. 

...
२३ नगरसेवकांकडे लक्ष 
काँग्रेस, एमआयएमचे आमदार आणि शिवसेनेचे पालकमंत्री आदींनी एकत्रित येऊन भाजपला महापौरपदापासून रोखण्यासाठी काही व्यूहरचना केल्याचे दिसले नाही. याउलट काँग्रेस, शिवसेना, एमआयएमच्या उमेदवारांचा स्वतंत्रपणे अर्ज दाखल झाला. यातून महापौरपदाची निवड बिनविरोध होता कामा नये एवढीच राजकीय खेळी विरोधकांनी केल्याचे दिसते. महापौरांच्या निवडप्रक्रियेवेळी ७३ पैकी ५० नगरसेवक भाजपचे वगळले, तर उर्वरित २३ नगरसेवक कुणाला मतदान करतात की तटस्थ राहतात अथवा अनुपस्थित राहतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. शिवाय भाजपवगळता महापौर निवडीतील माघारीच्या प्रक्रियेत कुठला उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो हेही तपासणे औत्सुक्याचे ठरेल. भाजपने दमण, नंतर सिल्वासाच्या पर्यटनातून आपले ५० नगरसेवक तर सांभाळले आहेत. 

...
मनपातील बलाबल 
भाजप.........५० 
राष्ट्रवादी.......०८ 
काँग्रेस.........०६ 
एमआयएम....०४ 
समाजवादी.....०२ 
बसप............०१ 
शिवसेना........०१ 
लोकसंग्राम......०१ 
अपक्ष............०१ 
एकूण............७४ 
(राजीनाम्यामुळे लोकसंग्रामचे पद रिक्त)  

...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com