पदांच्या वाटपावरून भाजपमध्ये नाराजीचा सूर?

महापालिकेत बहुमताने सत्ता मिळालेल्या भाजपमध्ये पदांच्या वाटपावरून प्रादेशिक वाद निर्माण झाला आहे. उघडपणे नगरसेवक बोलत नसले तरी अंतर्गत खदखदणारी नाराजी निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, विरोधकांकडून देखील भांडवल करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
pawar- Gite
pawar- Gite

नाशिक : महापालिकेत बहुमताने सत्ता मिळालेल्या भाजपमध्ये पदांच्या वाटपावरून प्रादेशिक वाद निर्माण झाला आहे. उघडपणे नगरसेवक बोलत नसले तरी अंतर्गत खदखदणारी नाराजी निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, विरोधकांकडून देखील भांडवल करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच २०१७ च्या निवडणुकीत भाजपला बहुमताने सत्ता मिळाली. यापूर्वी जोड-तोड, युतीच्या माध्यमातून महापालिकेत सत्ता स्थापन करण्यात झाली. भाजपचे ६६ नगरसेवक निवडून आल्याने एकहाती सत्ता आली. भाजपला शहरातील सर्वच विभागातून यश पदरात पडले. त्यानुसार सत्तेची महत्त्वाच्या पदांचे वाटप करताना समतोल राखणे गरजेचे असताना पंचवटी विभागात आतापर्यंत महत्त्वाच्या पदांचे वाटप करण्यात आल्याने अंतर्गत खदखद यापूर्वी होतीच आता सभागृहनेते व गटनेते पदांमध्ये खांदेपालट करताना पंचवटी विभागालाच झुकते माप दिल्याने अन्य विभागात भाजपचे नगरसेवक नाहीत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सिडको, सातपूर दुर्लक्षित
भाजपच्या सत्ताकाळात पंचवटी विभागातून महापौरपद रंजना भानसी यांना देण्यात आले. याच कालावधीमध्ये आमदारदेखील भाजपचे होते. स्थायी समिती व विषय समित्यांवर देखील पंचवटी विभागातील नगरसेवकांनाच सर्वाधिक स्थान मिळाले. दोन वर्षे गटनेतेपद जगदीश पाटील यांच्याकडे राहिले. पाचपैकी तीन वर्षे स्थायी समिती सभापतिपद व सध्या उपमहापौरपद पंचवटी विभागाकडे आहे.

आता सभागृहनेते व गटनेतेपद देखील पंचवटी विभागाकडेच असल्याने पक्षांतर्गत खदखद वाढली आहे. नाशिक रोड विभागाला एकदा सभागृह नेतेपद मिळाले. पूर्व विभागात एकदा उपमहापौर व सभागृहनेता पद मिळाले, तर सध्या महापौर याच विभागातील आहेत. सातपूर विभागाला एकदा सभागृह नेतेपद मिळाले. सिडको विभाग पदे मिळविण्यात दुर्लक्षित राहिला. पश्‍चिम विभागात दोनदा स्थायी समिती सभापतिपद देण्यात आले.

प्रभाग एकमध्ये पाच वर्षे सत्ता
२०१७ मध्ये निवडणूक पार पडल्यानंतर महापौर नियुक्त करण्याचा निर्णय झाला त्या वेळी प्रभाग क्रमांक एक मधील ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी यांना संधी देण्यात आली. अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर गणेश गिते स्थायी समितीचे सभापती झाले. सलग दोन वर्षे ते सभापती आहेत. आता अरुण पवार यांच्याकडे भाजप गटनेते पदाचा कार्यभार सोपविण्यात आल्याने सलग पाच वर्षे या प्रभागात सत्ता आहे. त्यामुळे न भुतो असा प्रभागाचा विकास होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com