मालेगावचे न्यारे आंदोलन... रस्त्यावरच्या पाण्यात घेतली लोळण

मालेगाव शहराची बातच न्यारी. काही तरी नवे अन् चाकोरीबाहेरचे करण्याच्या प्रयत्नात येथे अनेक गंमती घडतात. शहरातील चाळणी झालेल्या रस्त्याचा अनोखा निषेध झाला. महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आवामी पार्टीचे रिजवान अन्सारी उर्फ बॅटरीवाला यांनी रस्त्यातील पाण्यात संवाद्य लोळण घेत आंदोलन केले.
Malegaon road
Malegaon road

मालेगाव : मालेगाव शहराची बातच न्यारी. (Maleagao have a  different story always) काही तरी नवे अन् चाकोरीबाहेरचे करण्याच्या प्रयत्नात येथे अनेक गंमती घडतात. (There was fun many time in out of box activities) शहरातील चाळणी झालेल्या रस्त्याचा अनोखा निषेध झाला. (Agitation for substandard roads in city) महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आवामी पार्टीचे रिजवान अन्सारी उर्फ बॅटरीवाला (Rizwan Ansari alies batterywala) यांनी रस्त्यातील पाण्यात संवाद्य लोळण घेत आंदोलन केले. त्यामुळे या आंदोलनाची चांगलीच चर्चा झाली.   

मालोगावच्या जुन्या महामार्गाचे काम संथगतीने सुरु आहे. शहरातील विविध रस्यांची चाळण झाली आहे. त्याच्या निषेधार्थ आवामी पार्टीतर्फे आज जुन्या महामार्गावरील जाफरनगर भागात रस्त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात लोळण घेत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. निचरा न झालेल्या पावसाच्या पाण्यात सुमारे तासभर ते लोळत होते. यावेळी मोठी गर्दी झाली. त्यांच्या सहकाऱ्यांनी गाण्याची धुन वाजवत महापालिकेला याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. 

दोन आठवड्यांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांकडे माहापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी श्री. बॅटरीवाला यांनी महामार्ग व कुसुंबा रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये फुलांच्या पाकळ्या टाकून गांधीगिरी केली होती.  महापालिकेने त्याची दखल न घेतल्याने आज पुन्हा आंदोलन करण्यात आले.

महापालिकेचे अंदाजपत्रक सुमारे चारशे कोटीचे आहे. मात्र रस्ते व अन्य कामे निकृष्ट दर्जाची होतात. शहरवासियांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. या सर्व प्रकारांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच रस्ते, गटार, पथदीप या प्राथमिक नागरी सुविधा तातडीने व दर्जेदार व्हाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे श्री. बॅटरीवाला यांनी सांगितले. 

दुपारी आंदोलनस्थळी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विविध चित्रपटातील गाणी वाजवत हे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान श्री. बॅटरीवाला पाण्यात लोळण घेत पाणी में मछली छोडो, ये गिरणा है के मोसम नदी है । कार्पोरेशन का काम देखो ॥ असे म्हणत होते. दोन दिवसापुर्वी मध्यवर्ती गणेशोत्सव समिती व शांतता समितीच्या बैठकीत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्‍नी जोरदार खडाजंगी झाली होती. आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी बुधवारी महसूल व पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत तातडीने रस्त्यांची डागडुजी करु असे आश्‍वासन दिले होते. आज पुन्हा हे आंदोलन झाले. 

आंदोलनकर्त्यांनी स्वखर्चाने दोन ट्रॅक्टर मुरुम जुन्या महामार्गावरील खड्ड्यांमध्ये टाकत खड्डे बुजविले. रिजवान अन्सारी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात अब्दुल माजीद, अबु सुफीयान, यासर अराफात, सलीम अहमद, इम्रान अन्सारी, मोहंमद फैजान, नवीद अख्तर आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com