`राष्ट्रवादी`चा दणका, ५ महिने रेंगाळलेले काम ५ तासांत सुरु झाले !

नाशिक- पुणे महामार्गावरील सिन्नर टोल नाका बांधण्यात आला आहे. त्याअंतर्गत होणारी कामे वारंवार मागणी करूनही पाच महिने प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गायधनी यांनी आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरु केले.
Ganesh Gaidhani
Ganesh Gaidhani

नाशिक : नाशिक- पुणे महामार्गावरील सिन्नर टोल नाका बांधण्यात आला आहे. त्याअंतर्गत होणारी कामे वारंवार मागणी करूनही पाच महिने (Toll plaza delayed devolopment works five months) प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गायधनी (NCP Ganesh Gaidhani starts fast Agitation) यांनी आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरु केले. हे उपोषण सुरु होताच पाच महिने रेंगाळलेले काम पाच तासांतच सुरु झाले. (Pending works starts in 5 Hours) त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषणकर्त्यांचा सत्कार केला. 

सिन्नर टोलवेजच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गावर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात प्रामुख्याने पळसे गावाच्या प्रवेशद्वारावरील हायमास्ट बसविल्यानंतर अनेक महिने तो कार्यान्वित झालेला नव्हता. शिंदे- पळसे गावांदरम्यान दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडला खूप खड्डे झाले होते. त्याची डागडुजी न करता दुर्लक्ष केले जात होते. त्याची त्वरित व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.  पळसे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारील प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करून तिथे लाइटची सोय करावी.  बंगाली बाबा चौक ते फुलेंनगर येथे पथदीप बसवावेत. अशा विविध मागण्यांबाबत टोल प्लाझाच्या संचालकांना वारंवार निवेदन दिले जात होते. मात्र त्याकडे लक्ष दिले जात नव्हते. त्याबाबत असल्यामुळे नाशिक तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अनेक वेळा विविध प्रकारची आंदोलने करून या समस्यांना वाचा फोडली, परंतु काही कामे अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे नागरिकांच्या समस्या जैसे थे होत्या.  

या आंदोलनाची पुढची दिशा म्हणून राष्ट्रवादी युवक काँगेसचे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांनी पाच दिवसांपूर्वी टोल प्रशासनास ३० मेपर्यंतची ही कामे तातडीने पूर्ण करावीत. अन्यथा उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही प्रशासनाने काहीही हाचलाल केली नाही. या पार्श्वभूमीवर श्री. गायधनी यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यासोबत सोंवारी उपोषण सुरु केले.

हे उपोषण सुरु झाल्यावर मात्र महामार्ग प्रशासनासह विविध यंत्रणांनी टोल प्लाझा व्यवस्थापनाशी संपर्क साधला. त्यानंतर प्रशासनाने श्री. गायधनी यांना पत्र देऊ कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. लगेचच प्रत्यक्ष कामाला देखील सुरवात झाली. त्यामुळे पाच महिने रेंगाळलेले काम पाच तासांतच मार्गी लागल्याने त्यांचे उपोषण यशस्वी झाले. 

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल पेखळे, कार्याध्यक्ष आकाश पिंगळे, अभिषेक गायखे, सोनू ठोंबरे , सौरव गायखे आदी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com