महापालिका `स्मार्टसिटी` कडूनही दीडशे कोटी परत घेणार

पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर, दोन वर्षांत विकासकामे न झाल्याचा दावा करत महापौर सतीश कुलकर्णी यांनी अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर करतानाच विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढण्याची घोषणा केली.
Satish Kulkarni
Satish Kulkarni

नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर, दोन वर्षांत विकासकामे (next year is Elction, no devolopment works in last two years)  न झाल्याचा दावा करत महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांनी अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर करतानाच विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढण्याची घोषणा केली. त्याचबरोबर स्मार्टसिटी कंपनीची कामे बंद असल्याने विकासकामांसाठी दीडशे कोटीचा परतावा (NMC will take back 150 cr from Smart City Compony) घेण्याचीही घोषणा केली. 

महापालिका विकासकामांवर खर्च केल्या जाणाऱ्या १६५ कोटी रुपयांतून प्रभागांमध्ये समप्रमाणात डिसेंबरअखेर कामे करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या.

स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सोमवारी सादर केले. प्रशासनाने फेब्रुवारीत दोन हजार ३६१.५३ कोटी रुपयांचे अदांजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात, उत्पन्नाच्या बाजू गृहीत धरून विविध विकासकामांचा समावेश करताना ४०२.२५ कोटी रुपयांची वाढ करत दोन हजार ७६३.८१ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. सदस्यांनी केलेल्या विविध सूचनांचा अंतर्भाव करत दुरुस्तीसह हे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.

विकासकामांसाठी निधी
निवडणुकीचे वर्ष असल्याने विकासकामे मार्गी लावण्यासाठी ३०० कोटींचे कर्ज घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, स्मार्टसिटीची कामे बंद असल्याने एक हजार २०० कोटी शिल्लक असलेल्या रकमेपैकी महापालिकेला दीडशे कोटी रुपये परत घेणे, अतिरिक्त आयुक्तांना असलेल्या आर्थिक मर्यादेच्या अधिकारापर्यंतचे प्रस्तावच सादर करणे, दारणा धरणातून अळी व दुर्गंधीयुक्त पाणी उचलावे लागत असल्याने मुकणे व गंगापूर धरणांत विभागून आरक्षण टाकण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पत्रव्यवहार करणे, तसेच शहर विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी १६५ कोटींची विकासकामे ३१ प्रभागांत विभागून देण्याच्या सूचना महापौर कुलकर्णी यांनी दिल्या.

वैद्यकीय विभागाची श्‍वेतपत्रिका
कोरोनाकाळात प्रशासनाच्या कामकाजात अडथळा नको म्हणून दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांनी याचा वेगळा अर्थ घेतला. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर वैद्यकीय विभागाच्या खर्चाची श्‍वेतपत्रिका काढण्याची घोषणा महापौर कुलकर्णी यांनी केली.

...
निवडणुकीचे वर्षे असल्याने भरघोस निधीची तरतूद केली आहे. त्यासाठी कर्ज काढण्याची मुभा प्रशासनाला देण्यात आली आहे. अंदाजपत्रकात तरतुतूद करण्यात आलेली सर्व कामे झाली पाहिजेत.
- सतीश कुलकर्णी, महापौर
...
अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून उपयोग नाही. नगरसेवकांची विकासकामे प्रत्यक्षात झाली पाहिजेत, ही शिवसेनेची भूमिका आहे. पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. परसेवेतील अधिकाऱ्यांऐवजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळावी.
-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापलिका
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com