कोरोनामुळे २२ लाख मुले शाळाबाह्य ठरले!

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असताना, आता मुले शाळाबाह्य होण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वर्ष-दीड वर्षात जवळपास २२ लाख मुले शाळाबाह्य झाल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.
Sudhir Tambe
Sudhir Tambe

जळगाव : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असताना, (School, Collages closed due to covid epidemic) आता मुले शाळाबाह्य होण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. (Childrens out of school became a serious issue) वर्ष-दीड वर्षात जवळपास २२ लाख मुले शाळाबाह्य झाल्याची धक्कादायक (Shocking information of 22 lacs students became out of school) माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे, अशी माहिती आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr Sudhir Tambe) यांनी दिली. 

‘सकाळ’च्या जळगाव शहर कार्यालयात सोमवारी डॉ. तांबे यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. शाळा बंद असल्याने शिक्षणसंस्था, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत असून, त्यामुळे शाळा सुरू करण्यासंबंधी आम्ही आग्रही आहोत. याबाबत या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत ही भूमिका लावून धरू, असेही ते म्हणाले. 

डॉ. तांबे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांनी सोमवारी ‘सकाळ’ कार्यालयास सदिच्छा भेट देत विविध विषयांवर चर्चा केली. ते म्हणाले, की शाळा बंद असल्याने मुले एकलकोंडी होत आहेत. ऑनलाइन शिक्षण चांगला पर्याय होऊ शकत नाही किंवा तो शाश्‍वत उपायही नाही. 

...तर शिक्षण प्रक्रिया अपूर्ण 
शिक्षक आणि विद्यार्थ्याचा प्रत्यक्ष संवाद, संपर्क झाल्याशिवाय शिक्षणाची प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही. विद्यार्थी शाळेत केवळ पुस्तकी शिक्षण घेण्यासाठी जात नाही, तर शाळेच्या परिसरात प्रवेश केल्यापासून ते काही ना काही शिकत असतात. त्यामुळे विद्यार्थी- शिक्षक संवाद प्रत्यक्षच होणे गरजेचे आहे. 

टास्क फोर्सची ‘ना’ 
शाळा सुरू करण्यासंबंधी शासन अनुकूल होते. मंत्रिमंडळाचीही त्यास सहमती होती. मात्र, ‘टास्क फोर्स’ने त्याला प्रतिकूलता दर्शवली व शाळा सुरू करण्याचा निर्णय होऊ शकला नाही. योग्य उपाययोजना व काळजी घेऊन शाळा सुरू करता येऊ शकता, अशा पर्यायांवर विचार करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या वेळी त्यांच्यासमवेत प्रा. सुनील गरुड, शैलेंद्र खडके आदी उपस्थित होते.  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com