फडणवीसांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी अचानक पेटली   - Police vehicle in Devendra Fadnavis convoy caught fire | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

फडणवीसांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी अचानक पेटली  

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 जुलै 2021

देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथून त्यांच्या मूळ गावी मूलकडे जात हेाते.

नागपूर  ः माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या एका मोटारीला अचानक आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही. (Police vehicle in Devendra Fadnavis convoy caught fire)

देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथून त्यांच्या मूळ गावी मूलकडे जात हेाते. त्यावेळी सकाळी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. चंद्रपूर-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील नागभीड तालुक्यातील मोहाडी येथे फडणवीस यांच्या सुरक्षा पथकाच्या ताफ्यातील भरधाव वेगात असलेल्या पोलिसाच्या टीयूव्ही या गाडीने अचानक पेट घेतला. गाडीच्या बोनेटमधून धूर निघाल्याचे दिसताच चालकाने गाडी थांबवून गाडीतील सुरक्षा रक्षकांना तातडीने खाली उतरविले. 

हेही वाचा : राष्ट्रवादीची सत्ता घालविणाऱ्या मोहिते-पाटील समर्थक झेडपी सदस्यांचा मंगळवारी फैसला

अचानक पेट घेतलेल्या गाडीमध्ये पाच जण बसलेले होते. बोनेटमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने गाडी थांबवली. आतील सर्वांना खाली उतरविले, त्यानंतर थोड्याच वेळात आग भडकली. आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागास देण्यात आली हेाती. मात्र, अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपला पुढील दौरा सुखरूपपणे पूर्ण केला.

हेही वाचा : बंडातात्यांना अटक करून सरकारने काय साधले? : फडणवीस
 
पुणे :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पायी वारीला परवानगी नाकारली आहे. पायी वारी करण्यावर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता राजकारण तापू लागलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत टि्वट करीत फडणवीस यांनी सरकारचा निषेध केला आहे.  

वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असून विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय आहे. श्रद्धा-परंपरांचे महत्त्व आहेच! बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले? काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्‍यांचा असा अपमान? थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची आहे, असे टि्वट फडणवीस यांनी केलं आहे. 

बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चऱ्होली येथील संकल्प गार्डन येथे सुरु असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. बंडातात्या कराडकर यांना फलटण येथील त्यांच्या गुरुकुलमध्ये पाठविण्यात आले आहे. ''बंडातात्यांच्या सूचनेनंतर आम्ही हे आंदोलन स्थगित करीत आहोत," असे आंदोलन करणाऱ्या वारकऱ्यांनी सांगितले.  

यंदाही राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी नाकारली आहे. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी आज पहाटे पाचच्या सुमारास ताब्यात घेतलं होतं.  त्यांना अज्ञास्थळी हलविण्यात आले होतं. आमदार महेश लांडगे यांनी याबाबत पोलिस प्रशासनाशी चर्चा केली होती.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख