राष्ट्रवादीची सत्ता घालविणाऱ्या मोहिते-पाटील समर्थक झेडपी सदस्यांचा मंगळवारी फैसला - Mohite Patil supporter ZP's six rebel members to be heard before District Collector on Tuesday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

राष्ट्रवादीची सत्ता घालविणाऱ्या मोहिते-पाटील समर्थक झेडपी सदस्यांचा मंगळवारी फैसला

प्रमोद बोडके
शनिवार, 3 जुलै 2021

आता पुन्हा एकदा हे प्रकरण सुरू झाले आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी केलेल्या मोहिते पाटील गटाच्या सहा सदस्यांची सुनावणी येत्या मंगळवारी (ता. 6 जुलै) दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर होणार आहे. या सदस्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा व्हिप डावलत विरोधात मतदान केल्याने त्यांना अपात्र ठरावावे आणि  निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी केली आहे. (Mohite Patil supporter ZP's six rebel members to be heard before District Collector on Tuesday)

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. मार्चमध्ये शेवटची सुनावणी झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आणि लॉकडाऊनमुळे या प्रकरणावरील सुनावणी थांबली होती. आता पुन्हा एकदा हे प्रकरण सुरू झाले आहे. 

हेही वाचा : पृथ्वीराज चव्हाणांना विधानसभा अध्यक्ष व्हायचंय का? त्यांनीच दिले उत्तर...

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचे जिल्हा परिषद सदस्य मंगल वाघमोडे, शीतलदेवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, अरुण तोडकर, स्वरुपाराणी मोहिते पाटील आणि गणेश पाटील या सहा जणांनी राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान केले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. या बंडखोर सदस्यांना अपात्र करण्याची मागणी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे. 

 
संजय शिंदे प्रकरणाची 13 जुलैला सुनावणी 

जिल्हा परिषदेचे तत्कालीन अपक्ष अध्यक्ष व करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली होती. शिंदे यांच्यावर जिल्हा परिषद अधिनियमान्वये अपात्रतेची व निवडणूक बंदीची कारवाई करावी, अशी मागणी मोहिते-पाटील गटाचे सदस्य अरुण तोडकर यांनी केली आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीला देखील कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ब्रेक लागला होता. या प्रकरणाची सुनावणी आता मंगळवारी (ता. 13 जुलै) दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोरच होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख