माझ्याकडे सूत्रे सोपवा; ओबीसींना 4 महिन्यांत आरक्षण मिळवून देईन : फडणवीस

एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा.
I will retire politically if OBCs are not given reservation in four months : Fadnavis
I will retire politically if OBCs are not given reservation in four months : Fadnavis

नागपूर  ः राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण देणे जमत नसेल, तर त्यांनी सूत्रे आमच्याकडे सोपवावीत. ओबीसींना चार महिन्यांत आरक्षण परत मिळवून नाही दिले, तर मी राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. २६ जून) नागपूर येथे आंदोलनादरम्यान केली. (I will retire politically if OBCs are not given reservation in four months : Devendra Fadnavis)

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज (ता. २६ जून) ओबीसी आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्यभर हजारो कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे सहभाग घेतला. चंद्रशेखर बावनकुळे आणि इतरही नेते त्यांच्यासमवेत उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली.

संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण कायम असताना केवळ आणि केवळ महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसींचे आरक्षण मात्र रद्द झालेले आहे. एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दिला.

फडणवीस म्हणाले की, ज्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचले, त्या छत्रपती राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीदिनी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात ओबीसी आरक्षणाच्या निर्णायक लढ्याचा प्रारंभ करण्यात आला. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज आज अस्वस्थ आहे. राज्य सरकार म्हणून स्वत: काही न करणे, न्यायालयात फक्त तारखा मागत राहणे आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात धन्यता मानणाऱ्यांनी ओबीसी आरक्षणाचा बळी दिला आहे. 

‘‘राज्यातील मंत्री केवळ मोर्चे काढत राहिले. पण त्यांनी १५ महिने मागासवर्ग आयोग गठीत केला नाही. सर्वोच्च न्यायालयाने एम्पिरिकल डेटा मागितला असताना राज्यातील नेते जनगणनेचा डेटा हवा, अशी चुकीची माहिती देत आहेत. पूर्वी हेच मंत्री म्हणायचे की, एका महिन्यात एम्पिरिकल डेटा तयार करू. आता म्हणतात केंद्राकडून डेटा मिळत नाही. यांची ही बदललेली विधाने पाहता या सरकारला ओबीसी आरक्षण मिळूच द्यायचे नाही, हे स्पष्ट होते आहे. हेच मंत्री आदल्यादिवशी म्हणतात आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही आणि दुसऱ्याच दिवशी निवडणुका जाहीर होतात. समजा या निवडणुका झाल्या तर तसा प्रघातच पडेल आणि त्यामुळे ओबीसींचे आरक्षण संपेल,’’ असा दावा फडणवीस यांनी केला.

राज्य सरकारच्या हाती असूनही ह्यांनी वेळकाढू धोरण अवलंबिले आहे. हे सारे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी आहेत. ओबीसी आरक्षणाच्या विरोधातील याचिकाकर्ते हे काँग्रेसचे आहेत. त्यांच्यामुळे आरक्षण गेले. या सरकारला आरक्षण देण्यासाठी आम्ही बाध्य करू आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष आपले हे आंदोलन यापुढेही असेच सुरू ठेवेल. ओबीसी समाजाचे आरक्षण जोवर पूर्ववत होत नाही, तोवर हा संघर्ष असाच रस्त्यावर दिसत राहील, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com