अनिल देशमुख यांच्या काॅलेजवरही ईडीचा छापा... चारशे कोटी रुपयांचे गौडबंगाल!

देशमुख यांचा शोध जारी..
anil deshmukh
anil deshmukh

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. आज अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने टोल रोडवरील फेट्री या गावी असलेल्या त्यांच्या साई शिक्षण संस्थाद्वारा संचालित एनआयटी कॅम्पस या कॉलेजवर छापा घातला. (ED Raids on college run by Anil Deshmukh in Nagpur)

या छापासत्रामध्ये अधिकाऱ्यांच्या चमूसोबतच राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली आहे. अनिल देशमुख सध्या कुठे आहेत याची माहिती ईडीच्या अधिकार्‍यांनाही नाही, असे सांगितले जाते. त्या धर्तीवर अनिल देशमुख यांच्या कॉलेजवर आज घातलेला छापा हा त्यांच्यावरील कारवाईचा फास आवळला जात असल्याचे सांगितले जात आहे. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर त्यांचा मोठा मुलगा सलिल हा या संस्थेवर उपाध्यक्ष आहे त्यांची पत्नी आरती देशमुखही या संस्थेच्या पदाधिकारी असल्याची माहिती आहे. अनिल देशमुख यांचा पीए म्हणून अनेक वर्षे काम पाहत असलेला कुंदन शिंदे हा देखील या संस्थेवर पदाधिकारी आहे. कुंदन आणि दुसरे स्वीय सहायक संजीव पलांडे यांना या आधीच ईडीने अटक केली आहे.

ईडीने देशमुख यांच्या घरीही छापासत्र राबविले होते. त्यानंतर आज त्यांच्या कॉलेजवर ही कारवाई सुरू आहे. साई शिक्षण संस्था ही तीच संस्था आहे की ज्याच्या खात्यावर चारशे कोटी रुपये हवालामार्फत जमा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

देशमुख आणि त्यांच्या मुलाला ईडीने चौकशीसाठी बोलविले होते. मात्र याबाबत देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने दोन वेळा समन्स बजावूनही ते हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या हे देशमुख हे फरार असल्याचा आरोप करत आहेत. ईडी ही कायद्यानुसार चौकशी करत नसल्याचा आक्षेप देशमुख यांच्या वकिलांनी घेतला आहे. चौकशीला सहकार्य करूनही ईडी वारंवार त्रास देत असल्याची भूमिका देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. तेथे त्यांना दिलासा मिळणार का, याची आता उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com