मनसे आणि भाजप एकत्र आले तर आनंदच : मनसेच्या नेत्याची महत्वपूर्ण प्रतिक्रिया  

राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे नाशिक, पुणे आणि ठाण्याचा दौरा केला आहे.
 Raj Thackeray, Chandrakant Patil .jpg
Raj Thackeray, Chandrakant Patil .jpg

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (ता. ६ ऑगस्ट ) भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये राज ठाकरे यांच्या 'कृंष्णकुंज' निवासस्थानी सव्वा तास चर्चा झाली. त्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी भाष्य केले. (Nandgaonkar said on the meeting of Raj Thackeray and Chandrakant Patil) 

नांदगावकर म्हणाले, बाळा नांदगावकर म्हणाले, ''चंद्रकांत पाटील जेव्हा आले आणि गेले तेव्हा आनंदात होते. सगळ सकारात्मक होते. राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे नाशिक, पुणे आणि ठाण्याचा दौरा केला आहे. मुंबईतही पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. व्यक्तिगत पातळीवर सर्वच पक्षाची कामे सुरू आहेत. मात्र, दोन पक्ष भविष्यात एकत्र येण्याचा प्रयत्न असेल तर त्याचा आनंदच असेल, असे बाळा नांदगावकर म्हणाले. 

राजकारणात पुढच्या मुव्हमेंट करण्यासाठी त्याचे काही ठोकताळे असतात. त्या ठोकताळ्याचा अंदाज प्रत्येक पक्ष घेत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ठोकताळ्यांचा अंदाज घेऊन उद्धव ठाकरेंना बोलवून केल ना सरकार. त्याच प्रमाणे आजचाही हा ठोकताळाच आहे. असे सूचक विधान नांदगावकर यांनी केले. 

मनसे पुन्हा हिंदुत्वाची भूमिका घेणार आहे का?, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर, नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे यांच्या रक्तातच हिंदुत्व आहे. त्यामुळे तसा काही प्रश्नच येत नाही. आम्ही हिंदुत्व घेऊनच जात आहोत, असे त्यांनी सांगितले. मनसे आणि भाजपने एकदा ताकद आजमावून दाखवावीच असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावर संजय राऊतांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीच, असे आव्हान नांदगावकर यांनी दिले.  

चंद्रकांत पाटील काय म्हणाले...

या भेटीत आमची राजकीय चर्चा झाली. मात्र, मनसे-भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. युतीवर चर्चाही झाली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले होते. राज यांच्यासोबत नाशिकमध्ये अचानक भेट झाली होती. दोघेही प्रवासात होतो. त्यावेळी त्यांनी मुंबईत घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. चहा प्यायला बोलावले होते. त्यामुळे मी त्यांना आज भेटलो, असे पाटील यांनी सांगितले. 

राज ठाकरे यांना प्रदेश कार्यालयात का नाही बोलावले? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र, मी अहंकार मानणारा नाही. त्यांनी घरी बोलावले म्हणून गेलो. त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. या भेटीत राजकीय चर्चा झाली. मात्र, भाजप आणि मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचे विचार सांगणे हा या बैठकीचा विषय होता, असे पाटील म्हणाले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com