लॉकडाऊनवरून पालकमंत्री अन् खासदारामध्ये जुंपली

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्यातील काही शहरांमध्ये संचालबंदी लागू करण्यात आली आहे.
Lockdown in amrawati district critcise Mp navneet Rana
Lockdown in amrawati district critcise Mp navneet Rana

अमरावती : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने अमरावतीमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यावरून खासदार नवनीत राणा यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यात अपयश आल्याने ते लपविण्यासाठी चुकीच्या मार्गाने लॉकडाऊन केल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.

अमरावती शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर मंगळवारी जिल्ह्यात ९२६ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा व आरोग्य विभागाकडून पावले उचलली जात आहेत.  रुग्ण अधिक वाढू नयेत, यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजे पासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत शहरात संचारबंदी लावली होती. त्यानंतर अमरावती व अचलपूर तसेच मनपा क्षेत्रात एक आठवड्याची संचारबंदी लागू करण्यात आली. 

राणा यांनी निर्णयावर आक्षेप घेतला आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी इतर कोणत्याही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता संचारबंदी घोषित करून टाकली. ही संचारबंदी आपले अपयश लपविण्यासाठीच लावली असल्याचा आरोप राणा यांनी केला. 

लॉकडाऊनमुळे दररोज मोल मजुरी करून पोट भरणाऱ्या नागरिकांचा विचार केला नाही. या काळात महावितरणचे पथक ज्यांचे वीज बिल जास्त आहे अशा नागरिकांचे वीज कनेक्शन कापत आहे. त्यावरही नियंत्रण आणायला हवे होते मात्र ते न करता जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आल्याचे राणा यांनी स्पष्ट केले. 

लॉकडाऊनचा निर्णय सुरक्षिततेसाठीच

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून केवळ अमरावतीतच नव्हे, तर राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही साथ रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय नागरिक व समाजाच्या सुरक्षिततेसाठीच घेण्यात आला. 

पूर्वीच्या लॉकडाऊन कालावधीपेक्षाही आता अधिक बाधित आढळत असल्याने लॉकडाऊन व संचारबंदीशिवाय पर्याय नव्हता. पश्चिम विदर्भात बाधितांची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन विभागीय आयुक्तांनी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्याचे ठाकूर यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com