टीव्हीवरील लाईव्ह चर्चेत भाजप नेत्याला चपलेने मारले... व्हिडिओ व्हायरल

भाजपने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे.
On camera chappal hurled at Andhra Pradesh BJP leader during live TV show
On camera chappal hurled at Andhra Pradesh BJP leader during live TV show

नवी दिल्ली : वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसतात. अनेकदा अपशब्दही वापरले जातात. अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडले आहेत. पण एका लाईव्ह चर्चेमध्ये भाजपच्या नेत्याला चक्क चपलेने मारल्याचा प्रकार समोर आला आहे.

तेलुगू वृत्तवाहिनीच्या मंगळवारी प्रसारित झालेल्या एका लाईव्ह चर्चेदरम्यान हा प्रकार घडला आहे. ही चर्चा आखाडा बनल्याचे पाहायला मिळाले. या चर्चेमध्ये आंध्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस एस विष्णू वर्धन रेड्डी सहभागी झाले होते. तसेच अमरावती परिरक्षणा समिती संयुक्त कृती समितीचे सदस्य कोलिकापुडी श्रीनिवास राव यांचाही सहभाग होता. 

लाईव्ह चर्चेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये एका मुद्यावरून जोरदार वाद सुरू असल्याचे दिसते. राव यांचा तेलुगू देसम पक्षाशी संबंध असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला. त्यानंतर भडकलेल्या राव यांनी चप्पल काढून थेट रेड्डी यांच्या दिशेने फेकली. रेड्डी यांच्या तोंडाला ही चप्पल लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. 

या प्रकारानंतर भाजपने घटनेचा निषेध केला आहे. भाजपचे आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सोमू विराजू यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसारित करून निषेध नोंदविला. तसेच भाजपचे राष्ट्रीय सचिव व आंध्र प्रदेशचे सहप्रभारी सुनिल देवधर यांनीही या चर्चेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून हे घाणेरडे राजकारण असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यावरही टीका केली. 

टीडीपी पुरस्कृत हमला असल्याचा थेट आरोप भाजपचे खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी केला आहे. श्रीनिवास राव यांचा टीडीपीशी संबंध आहे. जर टीडीपी हे मान्य करत नसेल तर चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेचा निषेध करावा, असेही राव यांनी स्पष्ट केले. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com