श्रेयवादात अडकलेेल्या त्या रस्त्याचे कामच नित्कृष्ठ : `त्या` ठेकेदाराचे नाव डाॅ. विखे पाटील जाहीर करणार

पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ ते बेल्हा या राष्ट्रीय महामार्गाचेच कामका निकृष्ट झाले आहे, हा मोठा प्रश्न आहे.
sujay vikhe.jpg
sujay vikhe.jpg

पारनेर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत. ती सर्व चांगल्या प्रकारे सुरू असून, त्यांची कामेही दर्जेदार व चांगली झाली आहेत. मात्र पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ ते बेल्हा (Ralegan Therpal to Belha) या राष्ट्रीय महामार्गाचेच कामच का निकृष्ट झाले आहे, हा मोठा प्रश्न आहे. या कामाविषयी माझ्याकडेही अनेक तक्रारी आल्या आहेत. याचे कारण शोधावे लागले व त्यात कोण दोषी आहे त्यांची नांवे मी ठेकेदारांशी बोलून जाहीर करेल अशी माहिती खासदर डॉ. सुजय विखे यांनी दिली. (The work of the road that is stuck in the credit dispute is the best: the name of the contractor is Dr. Vikhe Patil will announce)

पारनेर तालुक्याला पुणे जिल्ह्याशी जोडणारा राळेगण थेरपाळ - निघोज- अळकुटी- बेल्हा या राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच झाले आहे. मात्र तीन महिण्यातच तो रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. या रस्त्याचे भूमिपुजन मोठ्या थाटात व तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील नेत्यांनीही केले होते. मात्र रसत्याचे काम सुरू झाल्या नंतर त्या कामाकडे कोणीच लक्ष दिले नाही. हा रस्ता व्हावा, यासाठी अनेकांनी आम्हीच प्रयत्न करून हा रस्ता मंजूर केल्याचा श्रेयवादही काही काळ तालुक्यात चांगला रंगला होता. मात्र काम निकृष्ट झाल्याने आता कोणीच त्याची जबाबदार घेतली नाही, हे मात्र विशेष आहे.

हा रस्ता निकृष्ट झाल्याच्या तक्रारी अनेक सामाजिक संघटना तसेच अनेक ग्रामपंचायतींनी केल्या आहेत. इतकेच नव्हे तर हा रस्ता खऱ्या अर्थाने मंजुरीसाठी पत्रव्यावहार तसेच फोनवरून चर्चा करूण मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता या रस्त्याच्या निकृष्ट कामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

या बाबत त्या वेळी भूमिपुजन करणारे डॉ. सुजय विखे यांना या बाबत छेडले असता ते म्हणाले, की गेली दीड वर्षे कोरोना महामारीमुळे त्या काळात मी त्या कामात व्यस्त असल्याने मला या कामाकडे लक्ष देता आले नाही, ही माझी चूक झाली, हे मी मान्य करतो.

मी कोणत्याही कामात टक्केवारी घेत नाही, मात्र तसे असतानाही हे काम ठेकेदाराने निकृष्ट का केले, याची शोध घ्यावा लागेल. यात कोणाचा सहभाग आहे का, हेही शोधावे लागेल. तरी सुद्धा हे काम निकृष्ट झाले असले, तरीही ठेकेदाराची अगामी तीन वर्षासाठी या रस्त्याच्या दुरूस्ती व देखभालीची जबाबदारी आहे. त्यामुळे त्याच्याकडून हा रस्ता दुरूस्त करूण घेतला जाईल. सध्या पाऊसळा सुरू आहे, त्यामुळे दीपावलीपर्यंत तो दुरूस्त केला जाईल.

ठेकेदाराचे त्या रस्त्याच्या कामाचे बील देणे बाकी आहे, ते थांबविण्यात येणार आहे. तसेच जर बील निघाले असले, तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल केला जाईल. आमची प्रतिम स्वच्छ आहे, मात्र हा रस्ता निकृष्ट होण्यासाठी तालुक्यातील कोणत्या राजकिय नेत्याचा किंवा सरपंच कार्यकत्यांचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यात येणार आहे. त्या साठी ठेकेदाराचीही बाजू ऐकून घेतली जाणार आहे, मी त्याच्याशी आजच चर्चा करतो व जो कोणी दोषी असेल, त्यांची नावे सुद्धा मी जाहीर करणार आहे, असेही शेवटी डॉ. विखे म्हणाले.

राळेगण थेरपाळ ते बेल्हा या राष्ट्रीय महामार्गाच्या 39 किलोमिटरसाठी 16 कोटी 36 लाख रूपये मंजूर झाले होते. या कामाची निवेदा 30 टक्के कमी दराने गेली होती. या रस्त्याच्या कामास 28 ऑगस्ट 2020 रोजी प्रारंभ झाला असून तो 27 मे रोजी पूर्ण झाला आहे.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com