आमदार आशुतोष काळे यांच्या कामांमुळे वेदना कोणाला होतात? - Who is in pain due to the actions of MLA Ashutosh Kale? | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार आशुतोष काळे यांच्या कामांमुळे वेदना कोणाला होतात?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 मे 2021

आमदार काळे यांच्या मदतीने शहराच्या विकासाची कामे मार्गी लागत आहे. भविष्यात देखील विकासकामांचा ओघ हा असाच सुरु राहिला, तर आपली पंचाईत होईल, अशी काहींना भीती वाटत आहे.

कोपरगाव : आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने विकासाचे प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र त्यामुळे काहींना वेदना होत असून, त्यांची आदळ आपट सुरु आहे. हा त्यांचा स्थायी स्वभाव असून आजपर्यंत ज्यांना शहराच्या विकासाची अॅलर्जी होती, त्यांना आता विकास करणाऱ्या आमदारांची देखील अॅलर्जी झाली असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली. (Who is in pain due to the actions of MLA Ashutosh Kale?)

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत 31 लक्ष 84 हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन आमदार काळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे बोलत होते. 

वहाडणे म्हणाले, आमदार काळे यांच्या मदतीने शहराच्या विकासाची कामे मार्गी लागत आहे. भविष्यात देखील विकासकामांचा ओघ हा असाच सुरु राहिला, तर आपली पंचाईत होईल, अशी काहींना भीती वाटत आहे. कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी कोपरगाव नगरपरिषदेत सर्वानुमते ठराव करून कोपरगाव शहरात रस्त्यांची कामे होवू द्यायची नाही, असा ठराव मंजूर केला. त्यावेळी आमदार आशुतोष काळे व मी स्वत:जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलो. त्यावेळी ही नामंजूर करण्यात आलेली विकासकामे मंजूर करण्यासाठी आमदार काळे यांची मोठी मदत झाली. ती कामे देखील सुरु होणार आहेत. परंतु ज्यांना विकास नकोय, ज्यांना जनतेला वेठीस धरायचे, अशी ज्यांची परंपरा आहे, त्या कोल्हे व कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी आपली परंपरा कायम ठेवत शहर विकासाला आजवर नेहमीच अडथळा आणला आहे. मात्र आमदार काळे कोपरगाव नगरपरिषदेच्या मागे खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळे आता ते विकासाला अडथळा आणू शकत नाही.

कोपरगावचा पाणीप्रश्न मार्गी लावू

कोपरगाव नगरपरिषद करीत असलेल्या शहरविकासाच्या कामाला मी व माझ्या नगरसेवकांनी सातत्याने पाठिंबा दिला आहे. विकासकामी कुठलाही अडथळा आणला जाणार नाही. त्यासाठी यापुढे देखील पाठिंबा राहणार आहे. शहराचा सर्वांगीण विकास व पिण्याच्या पाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावणे, हेच माझे ध्येय आहे, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

 

हेही वाचा...

संगमनेरमधील 50 गावे कोरोनामुक्त

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख