संगमनेरमधील 50 गावे कोरोनामुक्त, या कारनाने रुग्णसंख्या वाढली, मंत्री थोरात यांचे स्पष्टीकरण - 50 villages in Sangamner free of corona, this has led to increase in number of patients, explains Minister Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

संगमनेरमधील 50 गावे कोरोनामुक्त, या कारनाने रुग्णसंख्या वाढली, मंत्री थोरात यांचे स्पष्टीकरण

आनंद गायकवाड
रविवार, 30 मे 2021

दुसऱ्या लाटेत निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली. आगामी काळात काळजीपूर्वक काम करावे.

संगमनेर : "तालुक्‍यातील कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव काही अंशी कामी होत आहे. सध्या 50 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. मात्र, प्रत्येक गाव व संपूर्ण तालुका कोरोनामुक्त करायचा आहे. दुसऱ्या लाटेत निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली. आगामी काळात काळजीपूर्वक काम करावे. या लढाईत शिथिलता येऊ देऊ नये,'' असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. (50 villages in Sangamner free of corona, this has led to increase in number of patients, explains Minister Thorat)

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ""सर्वाधिक चाचण्यांमुळे रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे. तालुका कोरोनामुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू असलेला लढा अद्याप संपलेला नाही. ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करीत आहे; मात्र त्यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांच्या सहकार्याची आवश्‍यकता आहे. ग्राम सुरक्षा समितीने अधिक दक्षतेने काम करावे. लक्षणे आढळलेल्या रुग्णांचे विलगीकरण करावे.'' 

दरम्यान, जास्त रुग्ण आढळल्याने त्याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू होती.

हेही वाचा...

आरोग्य अधिकाऱ्यांच्या लढ्याला ग्रामस्थांचेही पाठबळ

संगमनेर : तालुक्यातील निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी वर्ग कोविडच्या महामारीत पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. त्यांच्या या लढ्याला आतात ग्रामस्थांचेही पाठबळ लाभत असून, वैद्यकिय साहित्य, औषधे व रोख रक्कमही मदतीच्या स्वरुपात दिली जात आहे.

कोविडची साथ सुरु होण्यापूर्वीपासून कोल्हार घोटी राज्यमार्गाच्या कडेला निमगावजाळी हद्दीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने कात टाकली होती. भौतीक सुविधांमध्ये वाढ करताना उत्तमोत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्याने, या ठिकाणच्या बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी नेहमीच रुग्णांची गर्दी असते. याचे सर्व श्रेय वैद्यकिय अधिकारी डॉ. तय्यब तांबोळी व त्यांच्या कर्मचारी वर्गाला जाते. स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या सर्व सुविधा, रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य अँड. रोहिणी निघुते, सरपंच अमोल जोंधळे, मच्छींद्र थेटे आदींसह इतर सामाजिक कार्यकर्त्यांचे सर्व घडामोडींवर लक्ष व सक्रीय सहभाग असतो. या चांगल्या कामात आत्ता स्थानिक ग्रामस्थांनीही सहभाग घेतला आहे.

निमगावजाळी येथील के. आर. जोंधळे कृषी सेवाभावी संस्थेच्या वतीने नुकतेच दहा हजार रुपये किंमतीचे वैद्यकीय साहित्य व औषधे या केंद्राला देण्यात आली. तसेच तसेच कृषी उद्योजक व शहिद जवान अशोक डेंगळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप डेंगळे यांनी 11 हजार रुपयांची आर्थिक मदत आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. तांबोळी यांच्याकडे दिली आहे. चांगेल काम करणाऱ्या या केंद्राला आर्थिकदृष्ट्या मदतीसाठी समाजातील दानशूरांनी पुढे येण्याचे आवाहन सरपंच अमोल जोंधळे, सामजिक कार्यकर्ते सुनील डेंगळे, ठकाजी थेटे, रामकृष्ण लंगोटे, नंदू डेंगळे, बाळासाहेब तळोले, अनिल डेंगळे आदींनी केले आहे.
 

हेही वाचा..

दिलासादायक, कोरोना कमी होतोय

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख