मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेण्याची विखे पाटलांची तयारी - Vikhe Patil is ready to take initiative for Maratha reservation | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेण्याची विखे पाटलांची तयारी

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 27 मे 2021

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली. राज्य सरकारमधील मंत्रीच आता विसंगत विधाने करू लागले आहेत.

शिर्डी : मराठा आरक्षणप्रश्नी सर्वांना एकत्र करण्यासाठी, समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेण्याची आपली तयारी आहे. अन्य कोणी पुढाकार घेतला, तर त्यास पाठिंबा देण्याची तयारी आहे. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या सर्वांनी एकत्र आल्याशिवाय या लढ्याला बळ मिळणार नाही, असे मत माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी व्यक्त केले. (Vikhe Patil is ready to take initiative for Maratha reservation)

पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, की "सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली. राज्य सरकारमधील मंत्रीच आता विसंगत विधाने करू लागले आहेत. मराठा समाजाला गृहीत धरून त्यांनी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहिले नाही. आता एका व्यासपीठावर येऊन, सामूहिक नेतृत्वातून राज्य सरकारवर दबाव आणावा लागेल. वेळ पडल्यास केंद्र सरकारकडेही जाऊ; परंतु सध्या तरी राज्य सरकारचे दायित्व महत्त्वाचे आहे.''

ते म्हणाले, ""ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजाच्या नेत्यांनी व संघटनांनी एका व्यासपीठावरून पुढील लढा उभारायला हवा. मराठा समाजाने वेगवेगळ्या व्यासपीठांवरून संघर्ष सुरू ठेवला. आता सर्वांनी एकाच व्यासपीठावरून हा लढा द्यायला हवा. सामूहिक प्रक्रियेतून निर्णय व्हायला हवेत. आजपर्यंत कोणत्या सरकारने काय केले, न्यायालयात कोण कमी पडले, यावर टीका-टिप्पणी करण्यापेक्षा आरक्षणाच्या हक्‍काच्या मागणीसाठी पुढे कसे जाता येईल, याचा विचार व्हायला हवा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेचे स्वागत करायला हवे. मात्र, राज्य सरकारनेही यासाठी आवश्‍यक असलेली कायदेशीर प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी.'' 

 

हेही वाचा...

ढाकणे कोविड सेंटरला अन्नपाकिटे भेट 

शेवगाव : संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या केदारेश्‍वर कोविड सेंटरला बोधेगाव परिसरातून मदतीचा ओघ सुरू आहे. दानशूरांनी कोविड सेंटरला पौष्टिक आहार व बाटलीबंद पाण्याचे बॉक्‍स भेट दिले. 

अध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या मार्गदशर्नाखाली केदारेश्‍वर कारखाना कार्यस्थळावर कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून कारखान्याने जपलेली सामाजिक बांधिलकी पाहून बोधेगाव परिसरातील अनेक व्यक्ती, संस्था रुग्णांच्या मदतीसाठी व सेवेसाठी पुढे येत आहेत. रुग्णांना या दानशूरांनी पौष्टिक आहार व बाटलीबंद पाण्याचे बॉक्‍स भेट दिले. 

अशोक मोडके, ज्ञानेश्‍वर पावसे, परशुराम विखे, राजेंद्र पालवे, सुनील फुंदे, प्रमोद विखे, संदीप बोडखे, प्रदीप देशमुख, प्राथमिक शिक्षक संघटना, बाबा पठाण, महावितरणचे सहायक अभियंता आर. एस. मेहता, प्रकाश दहिफळे, माधव काटे, शहाजी जाधव, तुषार वैद्य, रणजित घुगे, बाबा मुंढे, श्रीमंत गव्हाणे, विठ्ठल अभंग, मयूर वैद्य, श्रीकिसन पालवे, सुरेशचंद्र होळकर, संदीप जाधव, राहुल पालवे यांच्यासह व्यंकटेश मल्टिस्टेट पतसंस्थेने 21 हजार, एकबुर्जी तरुण मंडळाने 300 अंडी व ऍड. कार्तिक कमाने यांनी सुक्‍या मेव्याची पाकिटे दिली. अशा प्रकारची मदत महाराष्ट्रभर होण्याची गरज आहे.

हेही वाचा...

नगर जिल्ह्याने केला अडीच हजाराचा आकडा पार

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख