नगर जिल्ह्याने पार केला अडीच लाख कोरोना रुग्णसंख्येचा आकडा - The Nagar district has crossed the 2.5 lakh corona patient population | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्याने पार केला अडीच लाख कोरोना रुग्णसंख्येचा आकडा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 मे 2021

जिल्ह्यात आतापर्य़ंत कोरोना रुग्णांचा अडीच लाखांचा आकडा पार झाला आहे. एकूम दोन लाख 52 हजार 970 रुग्णसंख्या झाली आहे. तसेच एकूण दोन हजार 903 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नगर : जिल्ह्यात आतापर्य़ंत कोरोना (Corona) रुग्णांचा अडीच लाखांचा आकडा पार झाला आहे. एकूम दोन लाख 52 हजार 970 रुग्णसंख्या झाली आहे. तसेच एकूण दोन हजार 903 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्याही दोन लाख 34 हजार 665 वर आहे. काल जिल्ह्यात दोन हजार 191 रुग्णांची वाढ झाली आहे. (The Nagar district has crossed the 2.5 lakh corona patient population)

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये काल दिवसभरात ५६५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८११ आणि अँटीजेन चाचणीत ८१५ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २, अकोले २, जामखेड ६२, कर्जत ५, कोपरगाव ४२, नगर ग्रामीण ७५, नेवासा ७४, पारनेर ४३, पाथर्डी ६६, राहता २८, राहुरी ३, संगमनेर ६५, शेवगाव ६७, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट ३, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८१, अकोले ३, जामखेड ४, कर्जत १३, कोपरगाव २९, नगर ग्रा.४९,  नेवासा ३७, पारनेर २६, पाथर्डी ८२, राहाता ९४, राहुरी ३६, संगमनेर १९, शेवगाव ३०, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर २७९, कॅंटोन्मेंट बोर्ड ३ आणि इतर जिल्हा १० आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ८१५ जण बाधित आढळुन आले. मनपा २५, अकोले ३९, जामखेड ३६, कर्जत ३९, कोपरगाव ५०, नगर ग्रा. ३१, नेवासा ४८, पारनेर ८८, पाथर्डी ७१,  राहाता ३६, राहुरी ३९, संगमनेर ८७, शेवगाव ५४, श्रीगोंदा १२६, श्रीरामपूर ३९, कॅंटोन्मेंट बोर्ड १ आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२६, अकोले ११०, जामखेड ८५, कर्जत १३३, कोपरगाव १२८, नगर ग्रामीण १२९, नेवासा २९४, पारनेर १६०, पाथर्डी १७९, राहाता ९४, राहुरी १६०, संगमनेर १११, शेवगाव १११, श्रीगोंदा १८८,  श्रीरामपूर १४२, कॅन्टोन्मेंट २ आणि इतर राज्य ४६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

हेही वाचा...

संगमनेर रुग्णसंख्येत अव्वल

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख