सरकारच्या दुर्लक्षामुळेच पीक विम्यापासून शेतकरी वंचित, विखे पाटलांचा आरोप

मी कृषीमंत्री असताना पीकविमा योजना प्रभावीपणे राबविली होती. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत होता.
radhakrushna vikhe.jpg
radhakrushna vikhe.jpg

कोल्हार : ‘‘सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पीकविमा योजनेचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. याउलट, विमा कंपन्यांचाच (Insurance) फायदा झाला. त्यामुळे पीकविमा योजनेचे निकष बदलावेत आणि नव्याने पुन्हा अंमलबजावणी करून सरकारने कंपन्यांपेक्षा शेतकऱ्यांचे हित पाहण्याची गरज आहे,’’ असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. (Vikhe Patil alleges that farmers are deprived of crop insurance due to the negligence of the government)

कोल्हार बुद्रुक (ता. राहाता) येथे विखे पाटलांनी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांनी पीकविम्याबाबत, तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत येत असलेल्या अडचणी विखे पाटलांपुढे मांडल्या. मनकर्णाबाई घोलप, पोपट, गजानन, मच्छिंद्र व डॉ. संजय घोलप बंधू, राहाता बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब कडू, शशिकांत घोलप, सरपंच उमेश घोलप, जावेद शेख उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, ‘‘मी कृषीमंत्री असताना पीकविमा योजना प्रभावीपणे राबविली होती. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत होता. सध्याच्या सरकारने मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा केला. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली. विमा कंपन्यांचाच सर्वाधिक फायदा झाला. त्यामुळे या योजनेचे निकष बदलण्याची मागणी मी सरकारकडे केली आहे.’’

लसीकरणाबाबत नाराजी

गुहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सोनगाव, सात्रळ व धानोरे (ता. राहुरी) पंचक्रोशीतील लसीकरणातील हलगर्जी कारभाराविषयी नाराजी व्यक्त करून विखे पाटील म्हणाले, ‘‘कोल्हारच्या आरोग्य केंद्राने गाव तेथे लसीकरणाची मोहीम नियोजनबद्ध राबविली. त्यामुळे लाभार्थींची लसीकरणाबाबत तक्रार नाही. पंचक्रोशीतील वरील गावांमध्ये लसीकरणाबाबत सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्याशी बोलू व आरोग्य केंद्राशी संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना देऊ.’’
 

हेही वाचा..

‘आधारवेल’तर्फे २४७ जणांना अपघात विमा पॉलिसींचे वितरणराहुरी : आधारवेल फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त समाजातील गरजू २४७ कुटुंबप्रमुखांना मोफत अपघात विमा पॉलिसींचे वितरण करण्यात आले. ‘आधारवेल’च्या संस्थापक अध्यक्ष वैशाली नान्नोर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जितेंद्र मेटकर होते. तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, तालुका आरोग्याधिकारी डॉ. दीपाली गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस, अमृत धुमाळ, बाबासाहेब धोंडे, प्रकाश तारडे, सुरेश बानकर यांच्या हस्ते पॉलिसींचे वितरण झाले.

नान्नोर म्हणाल्या, की अपघातामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात. त्यांना विम्याचा आधार मिळणार आहे. ‘आधारवेल’च्या माध्यमातून गोरगरिबांना विविध स्वरूपाची मदत, गरजूंना विविध शासकीय योजनांचा लाभ, अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्याचे वाटप, निराधार व विधवा महिलांना आधार, महिला सक्षमीकरण, आत्महत्या केलेल्यांच्या व कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांना मोफत शेतीउपयोगी कृषी साधनांचे वाटप, कोरोना संकटात गरजूंना मोफत किराणावाटप करण्यात आला.
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com