ऑक्सिजनचे महत्त्व कळाले; आता वृक्षलागवड करा : अण्णा हजारे यांचा सल्ला

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड खूप गरजेची आहे. वृक्षांमुळे माणसांचे आरोग्य सुधारून अनेक आजार होणार नाहीत किंवा झाले तरी त्यांना निश्चित आपल्याला रोखता येईल.
anna hajare2.jpg
anna hajare2.jpg

राळेगणसिद्धी : ‘‘निसर्गाचे शोषण झाल्याने प्रदूषणात वाढ होऊन अनेक आजार वाढले आहेत. निसर्गातून मोफत मिळणाऱ्या ऑक्सिजनचे महत्त्व कोरोना महामारीत सर्वांना पटले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड खूप गरजेची आहे. वृक्षांमुळे माणसांचे आरोग्य सुधारून अनेक आजार होणार नाहीत किंवा झाले तरी त्यांना निश्चित आपल्याला रोखता येईल,’’ असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी व्यक्त केला आहे. (Understood the importance of oxygen; Plant trees now: Anna Hazare's advice)

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला हजारे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘मानवाने निसर्गाचे शोषण केल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. देशातच नव्हे, तर जगभरात पेट्रोल, डिझेल, रॉकेल व कोळसा यांचा मोठा वापर होत आहे. कार्बनडायऑक्साइडमुळे प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे आजार वाढले आहेत. अवेळी पाऊस येतो, वादळे येतात, पृथ्वीच्या तापमानात मोठी वाढ होत आहे. या पृथ्वीचे काय होणार, अशी चिंता जगातील लोक व शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. समुद्र आपली सीमा बदलत आहेत. बर्फाच्छादित प्रदेश वितळतात. पुढील ८० ते ९० वर्षांत समुद्राच्या कडेला असणाऱ्या शहरांना धोका निर्माण होईल, अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.’’

हजारे म्हणाले, ‘‘निसर्गाचे शोषण न करता पर्यावरणाचा विकास कसा करता येईल, याचा विचार आज सर्वांनी करणे गरजेचे आहे. राळेगणसिद्धी किंवा हिवरेबाजार येथे निसर्गाने जे दिले, त्याचाच वापर करून व्यक्ती, गाव व समाजाच्या विकासाचा विचार केला गेला. पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब अडवला गेला. त्यामुळे शेतीचा विकास झाला, भाकरीचा प्रश्न सुटला, शहराकडे धावणारी माणसे गावातच थांबली. राळेगणसिद्धीत लोकांनी एकत्र येत आतापर्यंत सुमारे अडीच ते तीन लाखांपेक्षाही अधिक झाडे लावली आहेत.’’

प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावा

पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल, तर पेट्रोल, डिझेल, रॉकेल व कोळसा यांचा वापर कमीत कमी केला पाहिजे. दर वर्षी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावण्याची व ते जगवण्याची प्रतिज्ञा करावी, असे हजारे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com