रस्त्यावर थांबून मंत्री भुसेंनी विकत घेतल्या भुईमुगाच्या शेंगा, केली शेतकऱ्यांची विचारपूस - Stopping on the road, Minister Bhusen bought groundnut pods and questioned the farmers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

रस्त्यावर थांबून मंत्री भुसेंनी विकत घेतल्या भुईमुगाच्या शेंगा, केली शेतकऱ्यांची विचारपूस

विनायक दरंदले
सोमवार, 28 जून 2021

एका ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत भुईमूगाच्या शेंगा विक्री सुरु होती. येथे थांबून त्यांनी  दोन किलो ओल्या शेंगा घेतल्या. शेतकरी अदिनाथ नवनाथ दहीफळे यांच्याशी संवाद साधत त्यांनी व्यथा जाणून घेतली.

सोनई : महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील कार्यक्रम आटोपून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या निवासस्थानी जाताना सोनई बसस्थानक येथे आपली मोटार व सर्व लवाजमा थांबून कृषी मंत्री दादा भुसे यांनी दोन किलो भुईमूगाच्या शेंगा खरेदी केल्या. (Stopping on the road, Minister Bhusen bought groundnut pods and questioned the farmers)

येथील बसस्थानक ते राहुरी रस्त्याच्या कडेला आज दुपारी अडीच वाजता मंत्री भुसे यांची मोटार अचानक थांबली. बरोबरच्या इतर दहा ते पंधरा मोटारी थांबल्या. काय झालं म्हणून सर्वच गोंधळात होते. बघ्याचीही गर्दी झाली होती. एका ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत भुईमूगाच्या शेंगा विक्री सुरु होती. येथे थांबून त्यांनी  दोन किलो ओल्या शेंगा घेतल्या. शेतकरी अदिनाथ नवनाथ दहीफळे यांच्याशी संवाद साधत त्यांनी व्यथा जाणून घेतली.

वंजारवाडी शिवारात जमीन असलेल्या दहिफळे यांना मंत्री भुसे यांनी असली हातविक्री परवडते का? असा प्रश्न विचारुन अन्य कुठले पीक घेता, शेतात ठिबक सिंचन व शेततळे आहे का, असे विचारले. शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना चांगली आहे. असे म्हणून त्यांनी शेतकरी दहिफळे यांना शुभेच्छा दिल्या. घेतलेल्या शेंगाचे पैसे देवूनच ते पुढील कार्यक्रमास गेले.

जलसंधारण मंत्री गडाख यांच्या वस्तीवर शिवसेना पदाधिकारी बैठक झाली. येथे मंत्री गडाख यांनी त्यांचे स्वागत केले. सर्व लहान मोठ्या पदाधिका-यांची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. फत्तेपुर येथील एक एकर क्षेत्रात चारा पीकाचे बियाणे घेवून पंधरा लाखाचे उत्पन्न घेतलेल्या अल्पभुधारक शेतकरी सोमेश्वर लवांडे यांचा त्यांनी सत्कार केला. नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात नव्याने बांधण्यात आलेल्या २९ कांदा आडतदार व्यावसायिक गाळ्यांचे उदघाटन केले.येथेही त्यांनी शेतकरी,व्यापारी व बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे बरोबर चर्चा केली.कांदा लिलाव व राज्यात प्रसिद्ध असलेल्या जनावरांच्या बाजाराबाबत त्यांना माहिती देण्यात आली. 
 

हेही वाचा..

शिर्डी विमानतळाकडे थकले पाच कोटी

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख