शिर्डी विमानतळाकडे करापोटी थकले पाच कोटी, स्नेहलता कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर - 5 crore tax evaders at Shirdi airport, Snehalta Kolhe arrests officials | Politics Marathi News - Sarkarnama

शिर्डी विमानतळाकडे करापोटी थकले पाच कोटी, स्नेहलता कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 जून 2021

एक महिन्यात पाणी योजनेचे काम सुरु करण्याचा शब्द दीपक शास्त्री यांनी कोल्हे यांना दिला आहे.

पोहगाव : काकडी ग्रामपंचायतीची शिर्डी (Shirdi) आंतराष्ट्रीय विमानतळाकडे करापोटी आजपर्यंत असलेली सुमारे पाच कोटी रुपयाची थकबाकी तातडीने द्यावी व पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरु करुन काकडीच्या ग्रामस्थांना लवकर पाणी द्यावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांची विमानतळावर भेट घेऊन केली आहे. (5 crore tax evaders at Shirdi airport, Snehalta Kolhe arrests officials)

एक महिन्यात पाणी योजनेचे काम सुरु करण्याचा शब्द दीपक शास्त्री यांनी कोल्हे यांना दिला आहे.

काकडी ग्रामपंचायतीची विमानतळाकडे सुरु झाल्यापासुनची कर बाकी येणे आहे. ग्रामपंचायतीने सातत्याने यासाठी पाठपुरावा विमानतळाकडे केला, मात्र त्यांनी कराचे पैसे अजुनही दिले नाही. जमिनी घेतांना दिलेले काही शब्द अजुनही विमानतळ विकास प्राधिकरणाने पुर्ण केले नाही, ही कैफीयत काकडीच्या ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनी माजी आ स्नेहलता कोल्हे यांना सांगितली. त्यांनी थेट विमानतळावर जाऊन आधिका-यांशी चर्चा केली. या वेळी पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम एक महिन्याच चालू करतो, असा शब्द दीपक शास्त्री यांनी कोल्हे यांना दिला. ठेकेदारामुळे कामास अडचण आल्याचे त्यांनी सांगितले.

काकडी ग्रामपंचायतीने अनेक कामे प्रस्तावित केले आहेत. विमानतळाकडे कराची बाकी आहे, त्यातुन हे कामे करण्याचा ग्रामपंचायतीचा उद्देश आहे. त्यासाठी तातडीने कराची बाकी द्यावी. तसेच इतर दिलेले सर्व आश्वासन पूर्ण करावीत, अशी मागणी कोल्हे यांनी केली.

शास्त्री म्हणाले, की वरिष्ठ पातळीवर काकडी ग्रामपंचायीच्या करासंदार्भातील कागदपत्रे पाठविली आहेत. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल. गावासाठीचे बाकी असलेले रस्ते लवकर करावे तसेच जिल्हा परिषदेची शाळेचे बांधकाम करुन द्यावे, अशी मागणी कोल्हे यांनी केली.

या वेळी विमानतळ टर्मीनल व्यवस्थापक मुरली कृष्णा, भाजपाचे तालुकाध्याक्ष साहेबराव रोहम,बाजार समीतीचे संचालक नानासाहेब गव्हाणे,भाजापा युवा मोर्चाचे अध्य़क्ष विक्रम पाचोरे,कैलास रहाणे,कानिफनाथ गुंजाळ,ग्रामसेवक बाजीराव बाचकर,उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे उपस्थित होते.

 

 

हेही वाचा..

खासदार विखे पाटील यांची गुगली

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख