सरकार कोसळण्यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले, थोरातांचा भाजपला टोला

काही लोक राज्यातले सरकार कोसळावे, यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. दिवसा स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत.
balasaheb thorat.jpg
balasaheb thorat.jpg

संगमनेर : ‘‘भाजपला  (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील या दोन नेत्यांच्या भेटीचा महाविकास आघाडी सरकारवर काही परिणाम होणार नाही. मात्र, यामुळे आशा पल्लवित झाल्याने काही लोक राज्यातले सरकार कोसळावे, यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. दिवसा स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत,’’ असा मिस्कील टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला. (Some put God in the water to bring down the government, Thorat's BJP tola ')

संगमनेर दूध संघावरील कार्यक्रमानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय पातळीवरील या दोन नेत्यांच्या भेटीत मला आश्चर्य वाटत नाही. काही प्रश्नांवर लोकशाहीत पक्षविरहित भेटी होणे ही लोकशाहीची प्रक्रिया असल्याने, त्यात काही गैर नाही. केंद्राच्या अखत्यारीतील अनेक प्रश्न राज्यात निर्माण झाले आहेत. त्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे केंद्राशी निगडित आहे.

याशिवाय कृषी कायदे रद्द करण्यासाठी आठ महिन्यांपासून लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. त्यांतील ५०० जणांनी हौतात्म्य पत्करले. ते कायदे रद्द होणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त देशाच्या सहकारी, अर्बन बँकावर निर्बंध आणणाऱ्या नवीन कायद्यामुळे रिझर्व्ह बँक या बँका ताब्यात घेईल, अशी परिस्थिती आहे.

त्यावरही चर्चा करण्यासाठी ही भेट होणे आवश्यक होते. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोकराव चव्हाण यांनीही भेटी घेतल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवरील या दोन नेत्यांच्या दिल्लीत एक तास झालेल्या भेटीचा राज्यातील आघाडी सरकारवर काही परिणाम होणार नाही.’’ या सरकारने दोन वर्षे चांगले काम केले; पुढील तीन वर्षे हे सरकार चालणार असल्याचा ठाम विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
 

हेही वाचा..

लोकपंचायतच्यावतीने दहा मदतकक्ष

संगमनेर : कोविड आजार व लसीकरण याविषयी अजूनही अनेक प्रकारचे समज-गैरसमज आहेत. आरोग्य यंत्रणेवर या परिस्थितीचा प्रचंड ताण आहे. अशा पार्श्‍वभूमीवर लोकांना कोविडविषयी योग्य सल्ला, मार्गदर्शन, विविध शासकिय योजनांची माहिती आणि समुपदेशनाची गरज ओळखून लोकपंचायत संस्थेने संगमनेर व अकोले तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रासह दहा ठिकाणी मदतकक्ष सुरू केले आहेत.

कम्युनिटी अ‍ॅक्शन फॉर हेल्थ (सीएएच) प्रकल्पांतर्गत तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील मदतकक्षाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी बोलताना डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी लोकपंचायतच्या विविध समाजोपयोगी कामांचा उल्लेख करून, लोककल्याणकारी योजना राबवताना सामान्य जनता व प्रशासनात लोकपंचायतने विविध ठिकाणी दुवा म्हणून यशस्वीपणे भूमिका पार पाडल्याचे गौरवोद्गार काढले.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com