आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून बीड-नगर जिल्ह्यासाठी हा मोठा निर्णय

आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने दोन्ही देवस्थान समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक धस यांच्या घरी झाली.
Suresh Dhas.jpg
Suresh Dhas.jpg

पाथर्डी : मायंबा (Mayamba) व मढी (Madhi) देवस्थान समित्यांकडून संयुक्त उपक्रम हाती घेण्यात येत असून, ४५ कोटी खर्चून दोन्ही देवस्थानांना जोडणारा रोप-वे केला जाणार आहे. राज्यातील हा एकमेव उपक्रम ठरणार असल्याचे आमदार धस यांनी सांगितले. (This is a big decision for Beed-Nagar district through the initiative of MLA Suresh Dhas)

आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने दोन्ही देवस्थान समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक धस यांच्या घरी झाली. मायंबा देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, मढी देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड, बबन मरकड, शिवजित डोके आदी उपस्थित होते.

गर्भगिरी डोंगररांगांमध्ये श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे नाथ संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. येथून जवळच नाथ संप्रदायाचे आद्य मच्छिंद्रनाथांची संजीवनी समाधी मायंबा (सावरगाव) आहे. तेथून जवळच चैतन्य कानिफनाथांची संजीवन समाधी मढी येथे आहे. संपूर्ण परिसरात औषधी वनस्पतींमुळे अत्यंत शुद्ध हवामान असते. पावसाळ्यात तर या परिसरात राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात.

मायंबा देवस्थानची उंची जास्त असून, रस्ता अत्यंत अवघड आहे. अलीकडील काही वर्षांत सर्व देवस्थाने डांबरी रस्त्याने जोडली गेली, तरी सोयीस्कर दळणवळण व्यवस्था नसल्याने, अनेक भाविक मढीहून दहा किलोमीटरचा घाटरस्ता चढून पायी मायंबाला जातात. धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटनाला असलेला प्रचंड वाव व यातून संपूर्ण परिसराचा होणारा सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवून दोन्ही देवस्थान समित्यांनी विकासकामांचा निर्णय घेतला आहे.

वणी (नाशिक), गिरनार पर्वत (गुजरात) आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या रोप-वेच्या सुविधेचा चर्चेत आढावा घेण्यात आला. पुढील महिन्यात यासाठी पुन्हा बैठक होणार आहे.

मढी व मायंबा देवस्थानांची संयुक्त बैठक आमदार धस यांच्याबरोबर झाली. धस यांच्या माध्यमातून संयुक्त विकास मोहीम राबविणार आहोत
- संजय मरकड, अध्यक्ष, कानिफनाथ देवस्थान, मढी

आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने सुरू असलेली विकासकामे मायंबा व परिसरात लक्षणीय ठरली आहेत. मढी देवस्थान समितीचे सहकार्य लाभल्याने विकासाचा वेग वाढेल.
- दादासाहेब चितळे, अध्यक्ष, मायंबा देवस्थान

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in