शिवसेेनेचे विजय औटी विधानसभा लढणार नाहीत, स्वतःच केली घोषणा - Shiv Sena's victory will not be fought in Auti Assembly, self-proclaimed | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

शिवसेेनेचे विजय औटी विधानसभा लढणार नाहीत, स्वतःच केली घोषणा

मार्तंड बुचुडे
गुरुवार, 8 जुलै 2021

गेल्या विधानसभा निवडणुकीत औटी विरुद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्यातील लढत चुरशीची झाली.

पारनेर : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी (Vijay Auti) यांनी विधानसभा लढणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कोण असेल, याबाबत उत्सुकता आहे. (Shiv Sena's victory will not be fought in Auti Assembly, self-proclaimed)

गेल्या विधानसभा निवडणुकीत औटी विरुद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्यातील लढत चुरशीची झाली. पूर्वी शिवसेनेेचे तालुकाप्रमुख म्हणून पदावर काम केलेल्या लंके यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश केला व औटी यांच्या विरुद्ध दंड थोपटले.

पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील एका कार्यक्रमात औटी यांनी घोषणा केली. ते म्हणाले, की या पुढे मी विधानसभेचा उमेदवार असणार नाही. आगामी काळात शिवसेनेचा उमेदवार कोण असेल, हे सांगू शकत नाही. परंतु कार्यकर्त्यांनी स्वतःला विकले जाऊ नये. स्वाभिमानाने रहावे. मी गेल्या पंधरा वर्षांपासून तालुक्याची वेगळी ओळख केली. अनेक विकास कामांच्या माध्यमातून तालुक्याचे नाव एका उंचीवर नेऊन ठेवले. एखाद्या गावाने मला मतांमध्ये लीड दिले नाही, म्हणून मी तेथील कामे करणार नाही, असे कधीच होऊ दिले नाही. गरज असेल, तेथे विकासकामे केली. यापुढे मात्र मी विधानसभेला उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, औटी यांच्या या विधानामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. लंके विरुद्ध औटी ही लढत आता यापुढे होणार नाही, परंतु लंके यांच्या विरोधात भविष्यात कोण उमेदवार असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. औटी यांनी स्वतःची उमेदवारी करण्याचे नाकारून कोणाला वाट मोकळी करून दिली, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

पारनेर विधानसभा मतदारसंघातील अनेक नागरिक विविध क्षेत्रात नोकरीस आहेत. विशेषतः मुंबईत अऩेक नागरिक आहेत. ते पारनेरचे मतदार आहेत. लंके यांनी यापूर्वी या लोकांचा विश्वास मिळविला. महिलांना देवीदर्शन घडवून प्रत्येक घरात आपले नाव नेले. त्याचा परिणाम विधानसभेत विजय मिळविता आला. औटी यांनी विकास कामाचा मुद्दा घेऊन प्रचार केला, परंतु मतदारांनी त्यांना साथ दिली नव्हती. 

गेल्या काही दिवसांपासून औटी यांनी सामाजिक कार्यक्रमास उपस्थिती वाढविली. त्यामुळे ते विधानसभेची तयारी करीत असल्याचे स्पष्ट होत होते. मात्र त्यांनी आपण विधानसभा लढविणार नसल्याचे सांगून कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का दिला आहे.

 

हेही वाचा..

खासदार विखेंना मंत्रीपदाची हुलकावणी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख