नगर जिल्हा रुग्णालयात मुलांसाठी स्वतंत्र विभाग - Separate ward for children in Nagar District Hospital | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

नगर जिल्हा रुग्णालयात मुलांसाठी स्वतंत्र विभाग

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 जून 2021

जिल्ह्यातील लहान मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण 11.5 टक्के आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने लहान मुलांना उपचारासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. 

नगर : जिल्ह्यात मे महिन्यात सुमारे नऊ हजार लहान मुलांना कोरोनाची (Corona) लागण झाली होती. लहान मुलांमधील कोरोनाचे प्रमाण लक्षात घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात 100 बेडचा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. 15 बेड अतिदक्षता विभागाचे राहणार आहेत. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातही काही बेड राखीव ठेवले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. (Separate ward for children in Nagar District Hospital)

जिल्ह्यात मे महिन्यात 91 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. यांपैकी सुमारे नऊ हजार 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले होती. जिल्ह्यातील लहान मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण 11.5 टक्के आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने लहान मुलांना उपचारासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. 

हेही वाचा..

जिल्ह्याच्या दक्षिण भागाला अवकाळीचा तडाखा 

नगर : अवकाळी पावसाने जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी हजेरी लावली. नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत आणि जामखेड या तालुक्‍यांमध्ये जोरदार पाऊस झाला. उत्तरेतील कोपरगाव आणि राहाता या दोन्ही तालुक्‍यांत दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्‍यांमध्येही पावसाने हजेरी लावली. 

जिल्ह्यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत आहे. सकाळपासूनच हवेत दमटपणा जाणवत आहे. दुपारनंतर उकाड्यात मोठी वाढ होत आहे. सायंकाळी पाच वाजल्यापासूनच पावसाला सुरवात होत आहे. अवकाळी पाऊस सुरवातीचे एक-दोन दिवस वादळी वाऱ्यासह कोसळत होता. वादळामुळे फळबागा, जनावरे, चारापिकांचे नुकसान झाले. सलग तीन दिवस झालेल्या या पावसामुळे नांगरट झालेल्या शेतातील ढेकळे फुटली आहेत. जमिनीतील उष्णता कमी होऊ लागली आहे. 

तालुकानिहाय झालेला पाऊस असा ः नगर 13.3, पारनेर 24.4, श्रीगोंदे 13.4, कर्जत 22.8, जामखेड 11.5, पाथर्डी 0.3, नेवासे 4.3, राहुरी 0.1, संगमनेर 2.5, अकोले 0.8, कोपरगाव 29.1, श्रीरामपूर 1.2, राहाता 12.1 मिलिमीटर. जिल्ह्यात सरासरी 9.5 मिलिमीटर पाऊस झाला. 

जिल्ह्यातील प्रमुख महसूल मंडलांत झालेला पाऊस ः नगर ः नालेगाव 16, कापूरवाडी 31.8, केडगाव 10.8, भिंगार 13.8, नागापूर 34.3, वाळकी 12.3, चास 13, रुईछत्तिशी 7.3. पारनेर ः पारनेर 20.8, भाळवणी 14.8, सुपे 62.8, वाडेगव्हाण 23, वडझिरे 11, निघोज 11.5, टाकळी ढोकेश्‍वर 26.8, पळशी 24.4. श्रीगोंदे ः श्रीगोंदे 27.5, बेलवंडी 40.8, देवदैठण 24. कर्जत- राशीन 29.5, भांबोरे 16.8, कोंभळी 20.8, मिरजगाव 20.3, माही 45.5. जामखेड ः अरणगाव 31, नायगाव 18.5. नेवासे ः नेवासे बुद्रुक 10.3, सलाबतपूर 15.5, कुकाणे 2.3. संगमनेर ः धांदरफळ 12.5, डोळासणे 9.5. कोपरगाव ः रवंदे 26.5, कोपरगाव 46.8, सुरेगाव 21.3, दहिगाव 29.1, पोहेगाव 22. राहाता ः शिर्डी 47.8, लोणी 12.1 मिलिमीटर. 

 

हेही वाचा..

तीन वर्षाची काव्या खासदार डाॅ. विखे पाटलांचे फोटो काढते तेव्हा

 

 

Edited By- Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख