तीन वर्षाची काव्या, खासदार डाॅ. विखे पाटलांचा फोटो काढते तेव्हा...

खासदार डाॅ.सुजय विखे तिथे पाहणी करायला आल्याबरोबर ती फोटो काढु लागली, या वेळी डॉ. विखे पाटील स्वतः पुढे होत त्यांनी तीच्या बरोबर एक सेल्फी काढला.
Vikhe.jpg
Vikhe.jpg

तिसगाव : कोविड(Corona) सेंटरमध्ये भेट देत असताना एक चिमुकली काव्या गणेश पाथरकर (वय 3) ही मोबाईल खेळत होती. खासदार डाॅ. सुजय विखे तिथे पाहणी करायला आल्याबरोबर ती फोटो काढु लागली, या वेळी डॉ. विखे पाटील स्वतः पुढे होत त्यांनी तीच्या बरोबर एक सेल्फी काढला. (Three-year-old Kavya MP Dr. When Vikhe takes a photo of Patil ...)

चिचोडी (ता. पाथर्डी) येथील एकनाथ आटकर मित्रमंडळाने सुरू केलेल्या आनंदऋषीजी कोविड सेंटरला भेट दिली, या वेळी पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड आदी उपस्थित होते.

या वेळी डाॅ. विखे म्हणाले, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपुर्ण प्रशासकीय यंत्रणाच कोलमडून गेल्या आहेत अशा परिस्थितीत लोकसहभागातुन सुरु केलेल्या कोविड सेंटरमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. चिचोंडी, तिसगाव, मिरीसह पाथर्डी तालुक्यात अनेक ठिकाणी लोकसहभागातुन कोविड सेटर उभारले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो कोरोनाग्रस्त गरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आज प्रतिकुल परिस्थिती असतानही आटकर यांनी उकृष्ट कोविड सेंटर चालवित असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

या वेळी रुग्णांना विखे यांचे हस्ते सफरचंद खजूर आदी ड्रायफ्रुट देण्यात आले. तालुक्यात लसीकरण कसे होते. स्टाफचे नियोजन कसे करता या बाबत डॉ. दराडे यांचेकडून माहीती घेत समाधान व्यक्त केले. या वेळी गणेश महाराज कुदळे, संदिप दानवे, विष्णु लेंडाळ आबा गरूड, विनोद भिंगारदिवे आदि उपस्थित होते.

हेही वाचा..

पोहेगाव कोविड सेंटरमुळे परिसरातील कोरोना आटोक्यात

कोपरगाव : तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना पोहेगाव ग्रामपंचायत, पोहेगांव नागरी पतसंस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र पोहेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरमुले परिसरातील रुग्ण संख्या आटोक्यात आली असून, तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी हे सेंटर सज्ज असल्याची माहिती शिवसेना नेते नितीन औताडे यांनी दिली. 

पोहेगाव सारख्या ग्रामीण भागातही कोविड सेंटर उभारून परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक मे सेंटर सुरू करण्यात आले. कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत औषध उपचार , जेवणाची मोफत व्यवस्था, मनोरंजनासाठी कोरोना रुग्णांच्या प्रत्येक हॉलमध्ये एलसीडी टीव्हीची व्यवस्था, मानसिक आधार या सर्व उपाययोजनामुळे पोहेगाव परिसरातील संसर्ग रोखण्यात यश मिळविले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन बडदे, डॉ राहुल गुडघे, डॉ. सुनिल मेहेत्रे, डॉ. जगदीश झंवर, डॉ. नितीन गवळी, डॉ. उषा गवळी, डॉ. आनंद काळे, डॉ. घनश्याम गोडगे, डॉ. नरेंद्र होन, डॉ. रावसाहेब जावळे, डॉ. गोरक्षनाथ रोकडे यांची भेट घेऊन परिसरातील या डॉक्टरांनी कोविड सेंटर मधील रुग्णांना मोफत तपासणी व उपचारासाठी वेळ दिला. त्यामुळेच महिनाभरात 160 रुग्ण या कोविड सेंटर मधून बरे होऊन घरी गेले. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता पोहेगाव कोरोना सेंटरमध्ये विविध सुविधा वाढवण्यात आल्या आहेत.‌

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com