संजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात : बावनकुळे

विकासाचे मुद्दे व धोरण नसल्याने, मंत्री काहीही बोलत नाहीत. संजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात.
संजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात : बावनकुळे
Bavankule.jpg

संगमनेर : जनतेने नाकारलेल्या मंडळींनी एकत्र येवून सत्ता स्थापन केली आहे. राज्यावरील अस्मानी व महाविकास आघाडी सरकारच्या सुलतानी संकटात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. विकासाचे मुद्दे व धोरण नसल्याने, मंत्री काहीही बोलत नाहीत. संजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला. (Sanjay Raut and Nana Patole just tweet: Bavankule)

महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याने, प्रशासनावर सरकारची पकड राहिली नाही. त्यामुळे महाराष्ट्राची २५ वर्ष पिछेहाट झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

संगमनेर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातर्फे राज्यभरात युवकांच्या संघटनांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षण गेले. मात्र आरक्षणासंदर्भात ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे नुकसान झाले असून, कुठलीही मदत तेथील लोकांपर्यंत पोहचू शकली नाही. तर उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. यावर एकही मंत्री बोलायला तयार नाही. राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना एकाही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. मात्र, आता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जाते आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेच्या समस्यांशी काहीही घेणे नाही. भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने राज्यात युवकांचे संघटन करण्यात येत आहे. युवकांच्या मनात महाविकास आघाडी सरकारबद्दल निर्माण झालेला रोष हे सरकार घालविण्यास कारणीभूत ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे, उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, योगराजसिंग परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, राजेंद्र सांगळे, संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, दिनेश सोमाणी, जगन्नाथ शिंदे, अरुण शिंदे, सुमित राऊत, केशव दवंगे, विनायक भोईर, सोमनाथ बोरसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in