चंद्रशेखर बावनकुळे नगरमधील भाजप कार्यकर्त्यांना आज देणार निवडणुकीचा गुरुमंत्र - Chandrasekhar will give election guru mantra to BJP workers in Bavankule Nagar today | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

चंद्रशेखर बावनकुळे नगरमधील भाजप कार्यकर्त्यांना आज देणार निवडणुकीचा गुरुमंत्र

मुरलीधर कराळे
शनिवार, 24 जुलै 2021

आगामी नऊ महिन्यांनी नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका आहेत. त्या दृष्टीने भाजप तयारीला लागले असून, बावनकुळे काय कानमंत्र देणार, हे लवकरच निश्चित होणार आहे.

नगर : जिल्ह्यात निवडणूका दूर असल्या तरी भाजपने जोरदार तयारी सुरू केलेली दिसून येते. त्याचाच भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज (शनिवारी) दोन दिवसांच्या नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. (Chandrasekhar will give election guru mantra to BJP workers in Bavankule Nagar today)

या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत. आगामी नऊ महिन्यांनी नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका आहेत. त्या दृष्टीने भाजप तयारीला लागले असून, बावनकुळे काय कानमंत्र देणार, हे लवकरच निश्चित होणार आहे.

बावनकुळे जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. देवळाली प्रवरा येथे आज सायंकाळी सहा वाजता त्यांचे आगमन होईल. या वेळी ते भाजप पदाधिकाऱ्यांचा भेटी घेऊन, पालिकेतील विकासकामांचा आढावा घेणार आहेत. रविवारी (ता. २५) दिवसभर त्यांचा दक्षिण नगर जिल्ह्यात दौरा राहील, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिली.

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी हे तीनही पक्ष मित्रपक्ष झाले आहेत. येत्या निवडणुकांत मात्र हे पक्ष स्वतंत्ररित्या लढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप रणनिती ठरवित आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील बडे नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत.

नगर शहरात महापालिकेची निवडणूक अडीच वर्षानंतर आहे. कोपरगाव, शिर्डी, राहाता, कर्जत, जामखेड, पाथर्डी, संगमनेर, पारनेर, नेवासे, श्रीगोंदे, श्रीरामपूर या शहरातील नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने भाजपने कोणती रणनिती करावी, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

बावनकुळे यांच्यानंतरही भाजपच्या नेत्यांचे लवकरच दौरे सुरू होणार आहेत, तथापि, ही सुरुवात असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. अद्याप निवडणूक लांब असली, तरीही मतदारांपर्यंत जाण्यासाठी काय करता येईल, याबाबतची रणनिती आजच्या दौऱ्यात ठरणार आहे.
 

हेही वाचा..

जयंत पाटलांना या कारणासाठी साकडे

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख