नगर महापालिकेवर भगवा ! महापौरपदी शिवसेनेच्या शेंडगे, उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे भोसले - Saffron on Municipal Corporation! Shendge of Shiv Sena as the mayor, Bhosle of nationalism as the deputy mayor | Politics Marathi News - Sarkarnama

नगर महापालिकेवर भगवा ! महापौरपदी शिवसेनेच्या शेंडगे, उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे भोसले

मुरलीधर कराळे
मंगळवार, 29 जून 2021

गेल्या महिनाभरापासून या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. शिवसेना व ऱाष्ट्रवादीचे अखेर सूत जुळल्याने भाजपला आता विरोधी बाकावर बसविण्याची वेळ आली.

नगर : महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे (Rohini shenge) व उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन उमेदवारांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे उद्या (बुधवारी) होणाऱ्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. (Saffron on Municipal Corporation! Shendge of Shiv Sena as the mayor, Bhosle of nationalism as the deputy mayor)

गेल्या महिनाभरापासून या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. शिवसेना व ऱाष्ट्रवादीचे अखेर सूत जुळल्याने भाजपला आता विरोधी बाकावर बसविण्याची वेळ आली. भाजपच्या मेळाव्यात भाजप नेत्यांनी काही सूचक वक्तव्य केले होते, त्यामुळे या निवडणुकीत ऐनवेळी काही चमत्कार होणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र आज दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

शेंडगे यांचा अर्ज काल (सोमवारी) दाखल झाला होता. उपमहापौरपदासाठी आज गणेश भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक-एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. उद्या अधिकृत घोषणा केली जाणार आहे. 

आज महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना काॅंग्रेसचे नगरसेवकही उपस्थित होते. भोसले यांनी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माणिक विधाते तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे म्हणाले, की राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर स्थनिक स्वराज्य संस्थामध्ये एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घेतलेला होता. त्यानुसार आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या निवडणुका पाडत आहोत. स्थानिक पातळीवर सर्वांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. राज्यामध्ये आगामी काळात सुद्धा महाविकासआघाडी अशा पद्धतीने निवडणूक लढणार आहे.

 

 

हेही वाचा..

थोरातांच्या जिल्ह्यात काॅंग्रेस बेदखल

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख