रस्त्याच्या कामाची मुदत संपली, ठेकेदाराला ठोठावला सव्वा कोटींचा दंड

या रस्त्याच्या कामाची मुदत संपूनही अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांनी संबंधित ठेकेदारास एक कोटी पस्तीस लाखांचा दंड केला.
Low.jpg
Low.jpg

राशीन : अडीचशे कोटी खर्चून हायब्रिड अॅन्युइटी योजनेतून सुरू असलेल्या बारामती-अमरापूर रस्त्याच्या कामापैकी खेड ते कर्जत या ३५ किलोमीटरच्या कामाला संबंधित ठेकेदाराचीच नजर लागली असून, कासवगतीने दर्जाहीन काम सुरू असल्याने रस्ता पूर्ण होण्याआधीच उखडला आहे. (The road work period expired, the contractor was fined)

विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामाची मुदत संपूनही अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांनी संबंधित ठेकेदारास एक कोटी पस्तीस लाखांचा दंड केला.

तत्कालीन मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मंत्रिपदाच्या काळात हे काम मंजूर झाल्याने राज्यमार्गाचे भाग्य उजळले; मात्र प्रत्यक्षात हे काम सुरू झाल्यावर त्यावर लोकप्रतिनिधींचा अंकुश न राहिल्याने उजळलेले भाग्य मातीमोल होत चालले आहे. खेड येथील भीमा नदीच्या पुलापासून कर्जतपर्यंत या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे, राशीनमध्ये आंबेडकर चौक ते साठे चौकादरम्यान ९५० मीटर कॉंक्रिटीकरणाचे काम वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. या कामातही मोठी चूक या ठेकेदाराने केली आहे.

यातील एका बाजूचा रस्ता उंच, तर दुसऱ्या बाजूचा रस्ता खाली गेला आहे. कर्जत ते राशीन या सोळा किलोमीटरच्या कामात संबंधित ठेकेदाराने अनेक त्रुटी ठेवीत रस्त्याचे काम केले आहे.

राशीन-खेडदरम्यान तर अनेक ठिकाणी निकृष्ट कामाचा कळस केला आहे. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत या ठेकेदारास कोणी जाब विचारणार आहे का, याकडे कोणी लक्ष देणार आहे का, कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या प्रवेशद्वारातून साकारत असलेला हा रस्ता मतदारसंघाचे नाक असणार आहे. त्यातून विकास आणि लोकप्रतिनिधी यांचा संदर्भ दिला जाणार आहे. त्यामुळे काही दिवसांत या रस्त्याची वाट लागल्यास येथील लोकप्रतिनिधींच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह लावले जाईल.

हेही वाचा..

ठेकेदारांची उचकापाचक कर्मचाऱ्याला भोवली

नगर : कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या दक्षिण बांधकाम विभागातील कनिष्ठ सहायक चित्रांग सुरेश सोनार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जारी केला आहे.
‘बाहेरील व्यक्ती घेतात कर्मचाऱ्यांच्या खुर्चीचा ताबा’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त करीत या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी बुधवारी दुपारी सव्वाचार वाजता जिल्हा परिषदेतील दक्षिण बांधकाम विभागाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी चित्रांग सोनार बसलेले असताना चार ते पाच ठेकेदार कार्यालयातील नस्ती उचकत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब कार्यालय शिस्तीस धरून नाही. सोनार हे जिल्हा परिषद कर्मचारी असून, त्यांनी सदैव निरपवाद, कर्तव्यपरायण असणे आवश्‍यक आहे. तथापि, कर्तव्याचे पालन न केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ च्या नियम तीनचा भंग झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली.
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com