भाजपांतर्गत गटांमुळे मुरकुटे यांच्यासमोर अडचणी वाढल्या - Murkute faced difficulties due to BJP factions | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

भाजपांतर्गत गटांमुळे मुरकुटे यांच्यासमोर अडचणी वाढल्या

सुनिल गर्जे
मंगळवार, 27 जुलै 2021

एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पक्ष बांधणी व नेटवर्क निर्माण करत असतानाच नेवासे तालुक्यालात मात्र भाजपात अंतर्गत वादावादी उफाळून आली आहे.

नेवासे : नेवासे तालुक्यात भाजपमध्ये ताके, मुरकुटे, लंघे, देसरडा असे चार गट पडले आहेत. नुकतीच पक्षातून हकालपट्टी झाल्याने निष्ठावंतांनी भाजप नेते विठ्ठल लंघे, सचिन देसरडा या दोघापैकी एकाला विधानसभेचा उमेदवार म्हणून स्वतः माजी आमदार मुरकुटे यांनी घोषित करावे, असे आवाहन करून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यापुढे अडचणी निर्माण केल्या आहेत.

एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पक्ष बांधणी व नेटवर्क निर्माण करत असतानाच नेवासे तालुक्यालात मात्र भाजपात अंतर्गत वादावादी उफाळून आली आहे.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत नगर येथे नुकत्याच झालेल्या जिल्हा भाजपच्या आढावा बैठकीनंतर पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल नेवासे तालुक्यातील भाजपच्या तिघा माजी पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान ही कारवाई माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंनी प्रदेशाध्यक्षांना एकतर्फी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याने करण्यात आल्यासह मुरकुटेंवर अनेक गंभीर आरोप केले आहे.

जिल्हा बैठकीत नेवासे तालुकाध्यक्षांनी पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर सायंकाळीच तालुकाध्यक्षाने पत्रक काढून जिल्हा भाजपचे नेते अनिल ताके, माजी तालुकाध्यक्ष दिनकर गर्जे, माजी नेवासे शहराध्यक्ष पोपट जिरे यांची पक्षातुन हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.

दरम्यान, यानंतर तालुक्यात भाजपच्या निष्ठावंत गटात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. युवा नेते अनिल ताके यांनी आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर माजी आमदार मुरकुटेंच्या पक्षविरोधी लीला मांडणार असल्याचे जाहीर करत २०१४-१९ या काळात नेवाशात भाजपचे विद्यमान लोकप्रतिनधी असताना देखील तालुक्यात पक्षाची पिछेहाट होणे अपमानास्पद असून, पक्ष संघटन वाढविणे तर दूरच, परंतु जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना ताकद न देता केवळ फक्त नातेवाईकांनाच आर्थिकदृष्ट्यासक्षम करण्याची मुरकुटे यांची कार्यद्धती पक्ष वाढीला खीळ घालणारी ठरल्याचा आरोप केला.

मुळा सहकारी साखर कारखाना, शनी शिंगणापूर देवस्थान निवड, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवणूक, नेवसे नगर पंचायत निवडणुकीसह तालुक्यातील काही महत्त्वपूर्ण ग्रामपंचयती निवडणुकीत मुरकुटे यांनी बोटचेपी व तडजोडीची भूमिका घेत मुरकुटे यांची राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह राष्ट्रवादीशी हातमिळवणी असल्याचा आरोप केल्याने मुरकुटेंबाबत भाजपात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुरकुटेंचे हे सर्व उद्योग आपण पक्ष श्रेष्ठींना निदर्शनास आणून दिल्यानेच मुरकुटेनीं आमच्या विरोधात कारवाई केल्याचा आरोपही करण्यात आला.

 

 

हेही वाचा..

आमदार लंके यांना लवकरच प्रमोशन

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख