पाॅझिटिव्ह न्यूज ! महसूलमंत्री थोरात यांचा मतदारसंघ कोरोनामुक्तीच्या मार्गावर

कोरोना महामारी आल्यापासून तालुक्‍यातील 174 गावे व वाड्या-वस्त्यांवर प्रादुर्भावाचे लोण पसरले. तालुक्‍यात रोज कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत होती.
balasaheb thorat.jpg
balasaheb thorat.jpg

संगमनेर : कोरोनाची (Corona) महामारी सुरू झाल्यापासूनच संगमनेर तालुका रुग्णसंख्येबाबत वरच्या क्रमांकावर होता. मात्र प्रशासन, नागरिकांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे आता तालुक्‍यातील 28 गावांत एकही कोरोना रुग्ण नाही. तसेच 101 गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. ही बाब तालुक्‍यासाठी शुभसंकेत ठरत आहे. (Positive news! Revenue Minister Thorat's constituency on the way to coronation)

कोरोना महामारी आल्यापासून तालुक्‍यातील 174 गावे व वाड्या-वस्त्यांवर प्रादुर्भावाचे लोण पसरले. तालुक्‍यात रोज कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत होती.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत संगमनेर शहरातील बाधीतांची रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. दुसऱ्या लाटेतही ही संख्या लक्षणिय असतानाच, तालुक्‍याच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण पुढे आले आहेत. त्यामुळे शहरासह तालुक्‍यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. 

ग्रामीण भागातील रुग्णवाढ थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी गावबंद, स्वयंशिस्त पाळली गेली. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. तालुक्‍यातील आभाळवाडी, आरामपूर, अजमपूर, बाळापूर, बांबळेवाडी, भोजदरी, दाढ खुर्द, गाभणवाडी, गोडसेवाडी, हसनाबाद, जुनेगाव, कणसेवाडी, कौठे मलकापूर, खांबे, खांडगेदरा, खरशिंदे, कुरण, कुरकुंडी, महालवाडी, माळवाडी, म्हसवंडी, पळसखेडे, पेमरेवाडी, शेळकेवाडी, शेंडेवाडी, शिंदोडी, शिरसगाव व वनकुटे या गावांत एकही कोरोना रुग्ण नसल्याने ती कोरोना मुक्त झाली आहेत. तसेच शंभरहून अधिक गावे कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. तालुक्‍यासाठी हा शुभसंकेत ठरत आहे. 

आजची स्थिती पाहता त्यातील 28 गावांनी कोरोनावर मात करीत शून्य रुग्णसंख्या गाठली असून, तब्बल 101 गावांमधील दहाच्या आतील रुग्णसंख्या पाहता या 129 गावांनी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक धक्का बसलेल्या संगमनेरसाठी ही बाब दिलासादायक ठरली आहे. 

राज्यातील वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत 15 मे व आत्ता थेट 1 जून पर्यंत कडक निर्बंध लागू केले असले, तरी संगमनेर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अद्याप फारशी कमी झाली नाही. शहरात भाजीपाला विक्रीसह विविध प्रकारच्या खरेदीसाठी दररोज मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी होत असते.

कठोर कारवाईच्या अभावामुळे सकाळी सात ते अकरा या निर्धारित वेळेनंतरही जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने व भाजीपाला विक्री सुरु असल्याने, ती बंद करण्याचे आवाहन प्रशासनाला करावे लागते. या दरम्यान इतरही वस्तू विक्रेत्यांनी अर्धवट शटर उघडी ठेवीत धंदा सुरु ठेवला आहे. कोंदट जागेत वाढलेल्या गर्दीमुळे रुग्ण संख्या वाढत आहे. 
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com