कुकडीचे आवर्तन 20 मे पासून, जयंत पाटील यांचे आदेश - Poultry rotation from May 20, orders of Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

कुकडीचे आवर्तन 20 मे पासून, जयंत पाटील यांचे आदेश

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 मे 2021

पुण्यात पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार रोहित पवार, आमदार अतुल बेनके, राहुल जगताप, अण्णा शेलार व घनश्‍याम शेलार यांनी आवर्तन लवकर सोडण्याची मागणी केली.

श्रीगोंदे : कुकडी डाव्या प्रकल्पातून 20 मे पासून शेती आवर्तन सुरू करण्याचे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काल दिले आहेत. (Kukdi's rotation from May 20, informed by Jayant Patil)

काल सायंकाळी पुण्यात पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार रोहित पवार, आमदार अतुल बेनके, राहुल जगताप, अण्णा शेलार व घनश्‍याम शेलार यांनी आवर्तन लवकर सोडण्याची मागणी केली.

येडगाव धरणात फिडिंगसाठी वेळ लागणार असल्याने 20 मे रोजी पायथा ते माथा, असे पूर्वी ठरल्याप्रमाणे आवर्तन सोडण्याचे ठरले. 

दरम्यान, या सगळ्या प्रकरणात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. औटी यांची समजूत काढतानाच, त्यांनी याचिका मागे घेतली नाही तर न्यायालयात काय बाजू मांडायची याचीही आखणी अधिकाऱ्यांना करून दिल्याचे समजले.

याच प्रश्नी आमदार रोहित पवार, बबनराव पाचपुते, राहुल जगताप, घनश्‍याम शेलार, अण्णा शेलार यांनीही मंत्री पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

 

हेही वाचा...

रात्रीपासूनच लसीकरण केंद्रासमोर रांगा 

श्रीरामपूर : कोरोना प्रतिबंधक लसीचे टोकण घेण्यासाठी येथील मेन रोडवरील टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहातील लसीकरण केंद्रासमोर नागरिकांनी रात्री दहा वाजेपासून रांगा लागल्या होत्या. 

मागील काही दिवसांपासून तालुक्‍यात लसीचा तुटवडा असल्याने लस मिळावी, म्हणून शहर परिसरात शेकडो नागरिक रात्री दहा वाजेपासून ते पहाटेपर्यंत लसीकरण केंद्रासमोरील मेनरोडवर रांगा लावून उभे होते. काहींनी टोकण मिळावे, यासाठी रांगेत दुचाकीसह चारचाकी वाहने लावली होती. कोरोनाच्या दुसरया लाटेत शहरासह तालुक्‍यातील ग्रामीण भागातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील संसर्गाचा वेग व मृत्यूदर अधिक असल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. परिणामी, कोरोनापासून बचावासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरल्याने लस घेण्यासाठी शेकडो नागरिक लसीकरण केंद्रावर फेऱ्या मारत आहे. परंतु गेल्या महिनाभरापासून लसीचा तुटवडा निर्माण असल्याने अनेक नागरिकांना लसीविना माघारी फिरावे लागत आहे. 

हेही वाचा...

निळवंड्याचे पाणी आणणार

ऑनलाईन नोंदणी सक्तीची असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह अशिक्षितांची गैरसोय होत आहे.  शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात असलेले लसीकरण केंद्र गर्दी कमी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सोईसाठी आरोग्य विभागाने स्थानिक प्रशासनाने शहरातील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात हलविले. 
परंतु तेथेही गर्दी होत आहे. ज्यांना एसएमएस मिळाले आहेत, त्यांनीच लस घेण्यासाठी यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे टोकण पद्धत सुरू करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून केंद्रात लस नव्हती. अखेर आज 150 डोस उपलब्ध झाले होते. त्यामुळे टोकण मिळविण्यासाठी पूर्वी पहाटेपासून केंद्रासमोर सुरू होणारी रांग आता रात्री दहा वाजेपासून लागली होती. 
लसीच्या तुटवड्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ आली आहे. तालुक्‍यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील लसीकरण केंद्रांसमोर देखील टोकण मिळविण्यासाठी नागरिकांच्या पहाटे पासून रांगा लागत आहे. 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख