पोपटराव पवारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे ! कोरोनामुक्त गाव स्पर्धा घ्यावी - Popatrao Pawar's support to CM! Corona free village competition should be held | Politics Marathi News - Sarkarnama

पोपटराव पवारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे ! कोरोनामुक्त गाव स्पर्धा घ्यावी

दत्ता इंगळे
शनिवार, 29 मे 2021

महाराष्ट्रात 28 हजार ग्रामपंचायतींमधून हिवरे बाजारच्या धर्तीवर कोरोना मुक्त गाव अभियान राबविण्यात यावे.

नगर : राज्यात कोरोना कमी होत असला, तरी भविष्यात वाढू नये. तसेच तातडीने कमी होण्यासाठी हिवरेबाजारच्या धर्तीवर राज्यातील सर्व ग्रामपचायतीमध्ये कोरोनामुक्त गाव अभियान राबवून तशी स्पर्धा घ्यावी, अशी मागणी राज्याच्या आदर्श गाव प्रकल्प व संकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. (Popatrao Pawar's support to CM! Corona free village competition should be held)

राज्यातील ग्रामीण भागातील जनतेने कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर शारिरीक व आर्थिक हानी अनुभवली आहे. याचा प्रादूर्भाव आजही वाढलेलाच आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून आताच जनजागृती करण्यासाठी गावाच्या एकोप्याने गाव कोरोना मुक्त होऊ शकते, हे हिवरे बाजारने राज्याला दाखवुन दिले आहे.

महाराष्ट्रात 28 हजार ग्रामपंचायतींमधून हिवरे बाजारच्या धर्तीवर कोरोना मुक्त गाव अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्यात कोरोना मुक्त गाव स्पर्धा राबवावी राज्याच्या 28 हजार ग्रामपंचायतीतून शासनाच्या वतीने ' कोराना मुक्त गाव स्पधी राबवल्यास प्रत्येक ग्रामस्थ आपले गाव कोरोना मुक्तीच्या एकजुटीने कार्य करतील . पत्रा सोबतच हिवरे बाजारने राबवलेल्या कोरोना मुक्त गावाचा अराखडा जोडला आहे . 

 

हेही वाचा...

सुरेश धस बनले कोविडरुग्णांसाठी देवदूत

तिसगाव : आमदार सुरेश धस यांनी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात अनेक कोवीड सेंटर उभारून रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत बनुन मदत करीत आहेत. राज्यातील अशा एकमेव आमदाराचे कौतुक करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस लवकरच मतदारसंघाचा दौरा करतील, अशी माहिती मुख्यमंत्री सहायता कक्षाचे माजी सचिव ओमप्रकाश शेटे यांनी दिली. 

श्री क्षेत्र मायंबा (सावरगाव) येथे चिल्ड्रन हेल्प फाउंडेशनच्या वतीने पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन प्रदान करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश धस, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, बाबासाहेब म्हस्के, सरपंच राजेंद्र म्हस्के आदींसह देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमातच एका नाथभक्ताने 50 थर्मामीटर व अकरा हजार रुपये मदतीचा धनादेश दिला. 

 

हेही वाचा..

दिलासादायक, कोरोना कमी होतोय

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख